वस्त्रोद्योग मंत्रालय
सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ओएनडीसीवर नोंदणी, बाजारपेठेतील अस्तित्व वाढवणे आणि हस्तकला आणि हातमाग उत्पादने ग्राहकांपर्यंत सहजपणे पोहोचवणे हा यामागचा उद्देश
भारतीय केंद्रीय कुटीर महामंडळाच्या वतीने (CCIC) 8 ते 23 जुलै 2023 दरम्यान ‘मेगा सेल’ प्रचार मोहिमेचे आयोजन
Posted On:
09 JUL 2023 12:53PM by PIB Mumbai
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम असलेल्या सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIC) अर्थात भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ मर्यादित आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्ससाठी (ONDC) यांच्यात झालेल्या सहकार्य कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाने आपल्या नवी दिल्ली जनपथ येथील जवाहर व्यापारी भवन शोरूममध्ये एका भव्य 'मेगा सेल' प्रसार मोहिमेचे आयोजन केले होते.
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनी, ओएनडीसी (ONDC) डिजिटल प्लॅटफॉर्मवर सीसीआयसी (CCIC) ची नोंदणी केली तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयातले सहसचिव आणि भारतीय केंद्रीय उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजय गुप्ता यांच्या उपस्थितीत “मेगा सेल” चे उद्घाटन केले. यावेळी ओएनडीसी (ONDC) चे व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी टी. कोशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सीसीआयसी आणि ओएनडीसी यांच्यातला सहकार्य करार म्हणजे भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाची बाजारपेठेतील अस्तित्व वाढवणे आणि ओएनडीसी नेटवर्कच्या विविध खरेदीदार ॲप्स च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपल्या उत्कृष्ट दर्जाची हस्तशिल्प आणि हातमाग उत्पादने पोचवण्याची कटीबद्धता दर्शवते.
भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळाने कारागीर आणि विणकरांना मदत करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फोर लोकल उपक्रमांमध्ये आपले योगदान देण्यासाठी 08 ते 23 जुलै 2023 या कालावधीत 'मेगा सेल' प्रचार मोहीम आयोजित केली आहे. भारतातील पारंपारिक कला, हस्तकला आणि हस्तकला करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोहिमेत, हस्तकला आणि हातमागाच्या वस्तूंवर 30% पर्यंत सूट देण्यात आली आहे. या सेल मधील प्रत्येक उत्पादन अस्सल, वेगळेपण जपणारे आणि उत्तम दर्जाचे असेल तसेच येथील प्रत्येक उत्पादन सत्यता, गुणवत्ता आणि पैशाच्या मूल्याची हमी देणारे असेल. ही प्रचार विक्री मोहीम, 23 जुलै 2023 सकाळी 10:00 ते संध्याकाळी 07:00 (सर्व दिवस) पर्यंत सुरू राहील.
भारतीय केंद्रीय कुटीर उद्योग महामंडळ मर्यादित (CCIC), हा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा सार्वजनिक क्षेत्रातील एक असून तो आपल्या नवी दिल्ली आणि इतर महानगरांमध्ये असलेल्या शोरूम च्या माध्यमातून सर्वोत्तम आणि अस्सल भारतीय हातमाग आणि हस्तकला उत्पादनांच्या जाहिरात आणि किरकोळ विपणनाचे कार्य करते.
***
S.Thakur/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938283)
Visitor Counter : 229