वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री देणार युकेला भेट,  मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी, व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराबाबत युरोपीय मुक्त व्यापार संघटनेबरोबर घेणार आढावा

Posted On: 09 JUL 2023 12:50PM by PIB Mumbai

 

भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 10 ते 12 जुलै दरम्यान युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान केवळ  भारत आणि इंग्लंड दरम्यान मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटी बाबतच नव्हे तर युरोपीय मुक्त व्यापार संघटनेतील (EFTA) सदस्य देशांच्या मंत्र्यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या  (TEPA) प्रगती बाबतही चर्चा करणार आहेत.

भारत आणि इंग्लंड परस्परांसह आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी तसंच द्विपक्षीय व्यापारात वाढ करण्यासाठी वचनबद्ध असून अशा महत्त्वाच्या वळणावर ही भेट नियोजित आहे. व्यापार कराराच्या वाटाघाटींना वेग आला असतानाचं या भेटीमुळे ही चर्चा आणखी पुढे जाणार असून या दोन्ही देशांदरम्यान आर्थिक वृद्धी आणि परस्पर संबंध मजबूत होण्याच्या उद्देशाने सर्वंकष आणि परस्पर लाभदायक करार करण्याचा मार्ग खुला होईल.

आपल्या भेटीदरम्यान वाणिज्य आणि उद्योग मंत्री इंग्लंडच्या आपल्या समकक्ष मंत्र्यांसह उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत ज्यात आंतरराष्ट्रीय व्यापार राज्य सचिव तसंच अनेक क्षेत्र आणि उद्योगांचे प्रतिनिधीही सहभागी असतील. या बैठकीद्वारे मुख्य प्राधान्यक्रम आणि मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची प्रमुख वैशिष्ट्ये याबाबत चर्चा करण्याची संधी मिळणार असून या चर्चेत व्यापारात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि प्रगत मालमत्ता अधिकार यासारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य वाढवण्याबाबत लक्ष केंद्रित असेल.

याशिवाय, पियुष गोयल युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या सदस्य देशांच्या (स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिंकटेस्टीन) मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराबाबत युरोपीय मुक्त व्यापार संघटनेशी सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत चर्चा करणार आहेत. व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या माध्यमातून भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटनेतील सदस्य देशांदरम्यान व्यापार आणि आर्थिक सहकार्यात वाढ, वाढत्या गुंतवणुकीच्या आणि व्यापारातील अडथळे कमी करण्याबाबत तसंच बाजारपेठेशी संपर्क सुकर होण्याच्या उद्देशाने वातावरण अनुकुलता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची भेट ही भारत सरकारची आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर सक्रिय सहभाग आणि आर्थिक वाढ तसंच विकासाच्या संधी शोधण्याबाबतची वचनबद्धता प्रतीत करते. यातून मजबूत आणि द्विपक्षीय लाभाचे व्यापारी संबंध वाढवण्याबाबतची इच्छाशक्ती प्रतिबिंबित होत असून होत असून ज्यामुळे केवळ भारत आणि इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला लाभ होणार नसून या दोन्ही देशातल्या नागरिकांची एकूण समृद्धी आणि कल्याणातही याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

***

S.Thakur/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1938281) Visitor Counter : 160


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil