वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रमांतर्गत ग्रोयो (Groyyo) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने ऑनबोर्ड आणि टॅग


हातमाग आणि हस्तशिल्पांच्या बाजारपेठ आणि खरेदीला प्रोत्साहन

Posted On: 08 JUL 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2023

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत (डीपीआयआयटी), एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) कार्यक्रमाने, गृहपयोगी वस्त्रे, सजावटीच्या वस्तू आदी विविध श्रेणींचा समावेश असलेल्या ओडीओपी म्हणून निवड झालेल्या उत्पादनांची ग्रोयो (Groyyo) च्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांना ऑनलाईन विक्री करता यावी यासाठी ग्रोयो कंपनीशी 3 जुलै, 2023 रोजी सहयोग केला.

या वन-स्टॉप ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टॅगिंगचा उद्देश म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची ओळख बळकट करणे आणि ओडीओपी उत्पादनांना अधिक बाजारपेठ प्रदान करणे आहे. यामुळे विक्रेत्यांना खरेदीदारांकडून उत्पादनांच्या आवश्यकतांबद्दल अधिक जाणून घेण्याची आणि त्यांची उत्पादने जागतिक स्तरावर विक्रीयोग्य बनविण्याची संधी मिळते.

यावेळी डीपीआयआयटी च्या संचालक सुप्रिया देवस्थळी यांनी कारागिरांना ग्राहकसंख्या विस्तारण्यासाठी  सक्षम करण्याकरिता अशा सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सरकार उद्योजकता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते, अशा सहकार्यातून कारागिरांना भरभराट होण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करते असे मत त्यांनी व्यक्त केले. 

या मंचावर उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमधील सिरेमिक, केरळमधील कोझिकोड येथील नारळ उत्पादने, जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील कानी शाल, छत्तीसगडमधील बस्तर येथील बेल मेटल क्राफ्ट यासारख्या देशाच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कारागीर उत्पादनांचा विविधांगी संग्रह या व्यासपीठावर आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. पुढे जाऊन, या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या श्रेणींचा विस्तार आरोग्यविषयक, दागिने इ.उत्पादनांमध्ये होईल. 

सध्या, ओडीओपीने देशातील सुमारे 100 जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या 35 हून अधिक ब्रँडचा अंतर्भाव केला आहे. उत्पादनाची सुलभता आणि मागणी वाढविण्यासाठी या मोहिमेअंतर्गत अधिक विक्रेत्यांना एकत्रित आणणे हे ध्येय आहे.

सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देत जिल्हा स्तरावर शाश्वत रोजगार निर्माण करणे हा एक जिल्हा एक उत्पादन कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे ही यामागील संकल्पना आहे.

ओडीओपी म्हणून निवड झालेली उत्पादने पाहण्यासाठी येथे क्लिक करा:  https://www.stylomania.in/pages/odop.

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1938162) Visitor Counter : 149


Read this release in: Telugu , English , Urdu , Tamil