संरक्षण मंत्रालय
संरक्षण संबंध दृढ तसेच धोरणात्मक भागीदारीत वृद्धिंगत करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मलेशियाचा करणार दौरा
Posted On:
08 JUL 2023 10:02AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 10-11 जुलै 2023 रोजी मलेशियाचा अधिकृत दौरा करणार आहेत. द्विपक्षीय संरक्षण सहकार्य दृढ करणे आणि धोरणात्मक भागीदारी अधिक वृद्धींगत करण्यावर दौऱ्यात लक्ष केंद्रित केले जाईल. राजनाथ सिंह, मलेशियाचे संरक्षण मंत्री दातो सेरी मोहम्मद हसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दरम्यान दोन्ही मंत्री उभय देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील. वचनबद्धता आणखी मजबूत करण्यासाठी नवीन उपक्रमांवरही चर्चा केली जाईल. दोन्ही पक्ष सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मतांची देवाणघेवाण करतील.
या भेटीदरम्यान मलेशियाचे पंतप्रधान वायबी दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम यांचीही राजनाथ सिंह भेट घेतील.
संपूर्ण प्रदेशात शांतता आणि समृद्धी नांदावी हा भारत आणि मलेशियाचा समान उद्देश्य आहे. दोन्ही लोकशाहींमध्ये मजबूत आणि बहुआयामी संबंध आहेत. संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक धोरणात्मक क्षेत्रांमध्ये याचा विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2015 मधील मलेशिया दौऱ्यादरम्यान चालना मिळालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या ध्येयदृष्टीमुसार काम करण्यासाठी दोन्ही देश वचनबद्ध आहेत.
***
JaydeviPS/Vinayak/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938121)
Visitor Counter : 170