अर्थ मंत्रालय

डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधा क्षेत्रात, भारताने अत्युत्तम कामगिरी केल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या आशिया प्रशांत क्षेत्रासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या जागतिक अहवालातील निष्कर्ष


जागतिक व्यापार सुविधांच्या प्रयत्नांच्या क्षेत्रात, भारत आघाडीवर, 2021 च्या 90.32 टक्के गुणांच्या तुलनेत, 2023 साली, 93.55 टक्के इतके गुण

व्यापार सुविधा क्षेत्रात महिला’ ह्या विभागात, लक्षणीय सुधारणा, 2021 च्या 66.7 टक्क्यांच्या तुलनेत, 2023 मध्ये 77.8% इतके गुण

दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताची कामगिरी सरस, कॅनडा, फ्रांस, इंग्लंड आणि जर्मनी यांसारख्या अनेक विकसित देशांपेक्षाही भारताची टक्केवारी उत्तम

Posted On: 07 JUL 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2023 

 

डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधा क्षेत्रात प्रगती करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा प्रत्यय आपल्या प्रयत्नातून आपल्याला वारंवार येत असतो. अलीकडेच प्रकाशित झालेल्या, संयुक्त राष्ट्रांच्या आशिया प्रशांत क्षेत्रासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या, डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधाविषयक जागतिक सर्वेक्षणाचे निष्कर्षही हेच सूचित करणारे आहेत. वर्ष 2023 च्या सर्वेक्षणात, 140 पेक्षा अधिक अर्थव्यवस्थांची तुलना करण्यात आली असून त्यात 60 व्यापार सुविधाविषयक उपाययोजनांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालानुसार,  व्यापार सुविधाविषयक प्रयत्नात, भारत आघाडीवर असल्याचे आढळले असून, वर्ष 2023 मध्ये भारताची टक्केवारी 93.55 टक्के इतकी आली आहे. 2021 मध्ये ही टक्केवारी, 90.32%  इतकी होती.

  

वर्ष 2023 च्या सर्वेक्षणात, विविध उपनिकषाद्वारे भारताने अनेक विषयात केलेली लक्षणीय प्रगती मांडत यात भारताला पूर्ण 100 टक्के गुण देण्यात आले आहेत- यातील प्रमुख निकष, पारदर्शकता, औपचारिक बाबी, संस्थात्मक व्यवस्था, सहकार्य आणि कागदविरहित व्यापार अशा सर्वच बाबतीत भारताने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. ही सर्वोत्तम गुणतालिका, व्यापार प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षात घेतलेल्या अथक परिश्रमांचाच पुरावा आहे. या प्रयत्नातून भारताने, व्यापार प्रक्रिया सुविहीत करणे, पारदर्शकता वाढवणे आणि विविध उपक्रम राबवून भागधारकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन अशा गोष्टी साध्य केल्या आहेत.

‘व्यापार सुविधांच्या क्षेत्रात महिला’ या निकषातही भारताच्या गुणानुक्रमात सातत्याने सुधारणा होत आहे. वर्ष 2021 मध्ये या बाबतीत भारताला 66.7% गुण होते, तर वर्ष 2023 मध्ये ते 77.8% इतके झाले आहेत. यातून स्त्री पुरुष समानतेच्या आणि व्यापार क्षेत्रात महिला सक्षमीकरणाच्या भारताच्या कटिबद्धतेची साक्ष  मिळते.

आता दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वात सरस ठरली आहे. भारताचा एकूण गुणानुक्रम, कॅनडा, इंग्लंड, फ्रांस, जर्मनी अशा अनेक विकसित देशांपेक्षाही अधिक आहे.

 

सर्वेक्षणाचे निकाल आणि इतर सविस्तर माहिती बघण्यासाठी UNESCAP च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

लिंक : (https://www.untfsurvey.org/economy?id=IND&year=2023).

 

* * *

S.Kakade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938063) Visitor Counter : 132


Read this release in: Urdu , English , Hindi , Odia , Telugu