ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी समूहाच्या स्थापित वीज निर्मिती क्षमतेने 73 गिगावॅटचा टप्पा ओलांडला
Posted On:
07 JUL 2023 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2023
एनटीपीसी या भारतातील आघाडीच्या एकात्मिक वीज निर्मिती कंपनीची स्थापित वीज निर्मिती क्षमता 73,024 मेगावॅटवर पोहोचली आहे. यामध्ये एनटीपीसीच्या मालकीच्या वीज निर्मिती प्रकल्पांची 57,038 मेगावॅटस स्थापित क्षमता आणि एनटीपीसीच्या सहाय्यक आणि संयुक्त उपक्रमांच्या मालकीच्या 15,986 मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे.
बिहारमधील बाढ सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या टप्पा -I (3 x 660 मेगावॅट) अंतर्गत 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट-2 कार्यान्वित झाल्यामुळे समूहाची एकूण क्षमता 73 गिगावॅटच्या वर गेली आहे.
यामध्ये 50 एनटीपीसी केंद्रे (26 कोळसा आधारित केंद्रे , 7 गॅस आधारित केंद्र , 1 हायड्रो स्टेशन, 16 नवीकरणीय ऊर्जा आधारित केंद्र) आणि संयुक्त उपक्रम आणि सहाय्यक कंपन्यांची 39 केंद्रे (9 कोळसा आधारित, 4 गॅस आधारित, 8 हायड्रो आणि 18 नवीकरणीय ऊर्जा आधारित केंद्रे) आहेत.
यामुळे देशाला विश्वसनीय आणि परवडणारी वीज पुरवण्याच्या एनटीपीसीच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते.
तसेच कंपनी 2032 पर्यंत 60,000 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता गाठण्यासाठी वचनबद्ध आहे.
एनटीपीसी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज उत्पादक कंपनी आहे, जी देशाच्या विजेच्या गरजेच्या 1/4 मागणी पूर्ण करते. औष्णिक, जल ,सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह, कंपनी सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि हरित भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी वचनबद्ध आहे.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937949)
Visitor Counter : 151