अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक


काही प्रमुख वित्तीय निकषांच्या आधारे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी सुधारल्याचे सूचित

Posted On: 06 JUL 2023 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2023

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री, निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज झलेल्या बैठकीत, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामगिरीचा, विविध वित्तीय निकषांच्या आधारे आढावा घेण्यात आला.या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते. वित्त तसेच व्यय विभागाचे सचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन; आर्थिक सेवा सचिव (DFS) डॉ. विवेक जोशी; दिपम (DIPAM) चे सचिव तुहिनकांता पांडे; सार्वजनिक उपक्रम विभागाचे सचिव  अली रझा रिझवी; कॉर्पोरेट व्यवहार सचिव, मनोज गोहिल; महसूल विभागाचे सचिव, संजय मल्होत्रा; गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार विभागाचे सचिव सचिव मनोज जोशी; वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार,   डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन; स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष  दिनेश खारा आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याव्यतिरिक्त DFS चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांसोबत, स्थूल अर्थव्यवस्थेचे सकारात्मक कल, व्यवसायविषयक मानसिकेत झालेली सुधारणा, दुहेरी ताळेबंदाचे फायदे आणि सार्वजनिक बँकांची कामगिरी अशा विषयांवर आढावा घेण्यात आला.

सर्व महत्वाचे वित्तीय निकष, जसे की क्रेडिट डिप्लॉयमेंट, नफा, मालमत्तेची गुणवत्ता, भांडवलाची उपलब्धता, यांच्या आधारावर सार्वजनिक बँकांच्या पीएसबीच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. बँकांकडे पुरेसे भांडवल असणे, त्यांच्या कार्यशैलीतील लवचिकता आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती असल्याचे यातून निष्पन्न झाले.

बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता, लक्षणीय रित्या वाढली, असून मार्च 2023 मध्ये, सकल एनपीए म्हणजे (बुडीत मालमत्ता) 4.97 टक्के तर निव्वळ एनपीए 1.24 टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष, 2022-23 मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी, सरासरी 1.05 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, आर्थिक वर्ष 2013 -14 च्या तुलनेत हा नफा तिप्पट आहे.

एकूणच सर्वंकष परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर, बँकर्सनी असे मत मांडले की, सध्याच्या मजबूत वित्तीय स्थितीच्या बळावर, स्थूल अर्थव्यवस्थेतील कोणताही धक्का सहन करण्यास बँका सक्षम आहेत.

सीतारामन यांनी जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून नियामक चौकटीचे पालन करण्यावर आणि व्यवसायाच्या पायावर भर दिला. अलीकडे  जागतिक बँकिंग क्षेत्रात  आव्हाने असूनही व्यवसायाचा दृष्टीकोन उत्तरोत्तर सुधारत आहे, असे त्या म्हणाल्या.

पीएम स्वनिधी  लाभार्थ्यांना  डिजिटल पेमेंट प्रणालीची सुविधा  सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिमेचे नेतृत्व बँकांनी करावे असे  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

पीएम स्वनिधी  अंतर्गत कर्ज पुरवठ्यामध्ये  सुधारणा करण्यासंदर्भात , केंद्रीय राज्यमंत्री (वित्त), डॉ भागवत किशनराव कराड हे  पीएम स्वनिधी योजनेच्या  व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ULBs) सहाय्याने विशेष मोहीम सुनिश्चित करतील असा निर्णय घेण्यात आला. डॉ कराड 1 सप्टेंबर 2023 पूर्वी पीएम स्वनिधी  संदर्भात  विशेष वित्तपुरवठा  जनसंपर्क  मोहिमेसाठी 6 टप्प्यात देशातील विविध क्षेत्रांना भेट देतील.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी  सार्वजनिक बँकांना खालील सूचना केल्या-

i.प्राधान्य क्षेत्र कर्ज (पीएसएल ) निकषांची पूर्तता करण्यासाठी ग्रामीण, कृषी आणि क्षेत्रीय कर्ज पुरवठ्यामध्ये  वाढ सुनिश्चित करा आणि पुढे सर्व उप-श्रेणींमध्ये पीएसएल उद्दिष्ट साध्य करणे सुनिश्चित करा

ii.पीएम स्वनिधी  अंतर्गत पदपथावरील  विक्रेत्यांना कर्ज  देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे  आणि पीएम  अंतर्गत कर्ज  वितरणाची गती कायम ठेवावी

iii नियामकाच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य आणि पारदर्शक पद्धतीने  एनपीए ओळखणे सुनिश्चित करा आणि  कर्ज थकबारीदारांच्या मालमत्तेची   योग्य  प्रकारे ओळख आणि नोंद होत  आहे  हे सुनिश्चित  करण्यासाठी बँकांनी वेळोवेळी त्याचा  अंतर्गत आढावा घेतला  पाहिजे

iv. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मोठा फायदा होण्याच्या दृष्टीने , प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या (आरआरबी ) प्रायोजक बँकांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कालबद्ध तांत्रिक अद्यतनीकरण  सुनिश्चित केले पाहिजे आणि  त्यांना अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्यासाठी त्यांच्या कार्यावर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे

v.बळकट जोखीम व्यवस्थापन पद्धतींसह संबंधित व्यवसाय मॉडेल जोखीम दूर करणे आणि कार्यक्षम आणि अनुकूल मालमत्ता दायित्व व्यवस्थापन करणे;

vi.ठेवींमध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचलावे तसेच सेवा आणि ग्राहक संरक्षण सुलभतेवर केंद्रित दृष्टीकोन स्वीकारणे.

 

 

S.Bedekar/R.Aghor/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1937847) Visitor Counter : 161