कोळसा मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यावसायिक आणि बंदिस्त खाणींमधील कोळसा उत्पादनाचा घेतला आढावा
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 162 दशलक्ष टन उत्पादन साध्य करण्याचे निर्देश
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2023 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2023
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज केन्द्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज कोळसा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी झालेल्या बैठकीत व्यावसायिक आणि बंदिस्त खाणींमधील कोळसा उत्पादनाचा आढावा घेतला. आपल्या ट्विट संदेशात ते म्हणाले की, व्यावसायिक आणि बंदिस्त खाणींमधील उत्पादनात दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सहा वर्षात 216% वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यावसायिक आणि बंदिस्त खाणींमधील कोळशाच्या उत्पादनात या आर्थिक वर्षात 39% वाढ कशी करता येईल यावर आजच्या बैठकीत जोशी यांनी चर्चा केली. भूमिगत कोळसा खाणींमधील उत्पादनाचा त्यांनी आढावा घेतला आणि 100 दशलक्ष टन कोळसा उत्पादन साध्य करण्यासाठी भूमिगत कोळसा खाण मोहीम योजनेवरही भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2020 मध्ये सीएम (एसपी) कायदा 2015/ 1957 च्या एमएमडीआर कायद्याअंतर्गत पहिल्या-वहिल्या व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला सुरूवात केली. आतापर्यंत, सहा व्यावसायिक कोळसा खाणपट्टयांचे लिलाव पूर्ण झाले आहेत. एकूण 218.9 दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या 86 कोळसा खाणींचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे. एकूण 98 खाणी असलेल्या व्यावसायिक कोळसा खाणपट्टा लिलावाचा 7वा टप्पा प्रगतीपथावर आहे.
व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव सुरू होण्यापूर्वी, कोळसा खाणी कार्यान्वित होण्याचा सरासरी कालावधी सुमारे पाच वर्षे होता. मात्र, व्यावसायिक लिलावानंतर कोळसा खाणींच्या कार्यान्वित होण्याचा सरासरी कालावधी बराच कमी झाला आहे. त्याचा परिणाम व्यावसायिक खाणींच्या उत्पादनाच्या योगदानावरही दिसून येत आहे. पहिल्या व्यावसायिक कोळसा खाणीचे उत्पादन वाटप झाल्यापासून एका वर्षात सुरू झाले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींमधील कोळशाचे उत्पादन 1.15 दशलक्ष टन (एमटी) आणि आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 7.12 मेट्रिक टन होते. 2023-24 मध्ये 12.2 दशलक्ष टन (एमटी) अपेक्षित कोळसा उत्पादनासह अतिरिक्त सहा व्यावसायिक लिलाव केलेल्या कोळसा खाणी कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1937825)
आगंतुक पटल : 171