कृषी मंत्रालय
भारत-आफ्रिका आंतरराष्ट्रीय भरड धान्य परिषदेसाठी नैरोबी येथे आज पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन
भारत आणि केनिया सरकारच्यावतीने 30-31 ऑगस्ट 2023 रोजी परिषदेचे सह आयोजन
Posted On:
06 JUL 2023 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2023
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करत असताना, भारत सरकारचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि केनिया सरकारचे कृषी आणि पशुधन विकास मंत्रालय केनियामध्ये ,आंतरराष्ट्रीय निम्न -शुष्क उष्ण कटिबंधांसाठी पीक संशोधन संस्थेच्या (आयसीआरआयएसएटी ) सहाय्याने ‘भारत -आफ्रिका आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचे ' सह आयोजन करणार आहेत. 30-31 ऑगस्ट 2023 रोजी होणार्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील सरकारमधील नेते , संशोधक, शेतकरी, उद्योजक आणि उद्योग संघटना इत्यादींचा सहभाग असेल.
'भारत -आफ्रिका आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषदे' साठी अधिकृत पूर्वरंग कार्यक्रम गुरुवारी केनियातील नैरोबी येथे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना काय अपेक्षित आहे, याची झलक पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाला केनियातील भारताचे उच्चायुक्त, भारत सरकारचे सहसचिव (पीक), केनिया सरकारचे प्रधान सचिव आणि आयसीआरआयएसएटीच्या महासंचालक उपस्थित होत्या. आयसीआरआयएसएटीच्या महासंचालक डॉ. जॅकलीन ह्युजेस यांनी या पूर्वरंग कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या विषयांची माहिती उपस्थितांना दिली. भरडधान्याचे अनेक फायदे सांगतानाच , त्यांनी यांत्रिकीकरण, बियाणे प्रणाली, डिजिटल शेती आणि भरडधान्याचे मूल्यवर्धन याविषयी सविस्तर सांगितले.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937785)
Visitor Counter : 142