संरक्षण मंत्रालय

फ्रांसच्या ‘बॅस्टिल डे’ पथसंचलनासाठी भारतीय सैन्यदलांचे पथक फ्रांसला रवाना

Posted On: 06 JUL 2023 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जुलै 2023

14 जुलै हा दिवस फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस (Fête Nationale Française) म्हणून साजरा केला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात, 1789 मध्ये याच दिवशी, बॅस्टिलपासून, या क्रांतीची ठिणगी पेटली होती. या वर्षी बॅस्टिल डे च्या कार्यक्रमाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी होणाऱ्या पथसंचलनात, भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही सेवांच्या 269 जवानांचे पथक फ्रांसच्या सैन्यासोबत सहभागी होणार आहेत. त्यासाठीच हे पथक आज फ्रांसला रवाना झाले.

भारतीय सैनिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात आपले शौर्य जगाला दाखवले होते, या पराक्रमासाठी भारतीय सैनिकांना अनेक शौर्य पुरस्कारही प्रदान करण्यात आले आहेत.

यावर्षी दोन्ही देशांच्या राजनैतिक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून,दोन्ही देशांचे सैन्य संयुक्त सरावात भाग घेणार असून आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करणार आहेत. गेल्या काही वर्षांत भारत आणि फ्रान्स विश्वसनीय संरक्षण भागीदारही बनले आहेत.

कॅप्टन अमन जगताप 77 मार्चिंग जवान आणि बँडचे 38 सदस्य असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करत आहे. भारतीय नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व कमांडर व्रत बघेल तर भारतीय हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी करत आहेत. भारतीय हवाई दलाची राफेल लढाऊ विमाने देखील पथसंचलनादरम्यान फ्लाय पास्टचा भाग बनतील.

 

 

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937730) Visitor Counter : 134