राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहिल्या

Posted On: 04 JUL 2023 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (4 जुलै, 2023) हैदराबाद येथे अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीच्या सांगता सोहळ्याला उपस्थित राहिल्या. यावेळी त्यांनी  उपस्थितांना संबोधित केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, अल्लुरी सीताराम राजू यांचा अन्याय आणि शोषणाविरुद्धचा लढा, हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अभिमानास्पद अध्याय आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, अल्लुरी सीताराम राजू यांचे जीवन म्हणजे जात आणि वर्गाच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता समाजाला एकत्र कसे आणता येते, याचे एक उदाहरण आहे. आदिवासी समाजाने अल्लुरी सीताराम राजू यांना आपला आदर्श मानले, तर त्यांनीही आदिवासी समाजाच्या सुख-दु:खाला आपलेसे केले, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. ते आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढले. विचारवंत, विशेषत: समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांनी अल्लुरी सीताराम राजू यांच्यासारख्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल  सर्व नागरिकांमध्ये, विशेषत: तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

समाजाच्या वंचित घटकांच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे काम करणे हा अल्लुरी सीताराम राजू यांच्या जीवनाचा संदेश आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांचे आदर्श आचरणात आणूनच आपण त्यांना खरी आदरांजली अर्पण करू शकतो, असेही त्या म्हणाल्या. समाज आणि देशाच्या हितासाठी अल्लुरी सीताराम राजू यांची मूल्ये आणि आदर्श सर्वांनी अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1937381) Visitor Counter : 127