विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
4 जुलै 2023 रोजी मुंबईमधील G20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम परिषदेत G20 सदस्य देशांमध्ये संशोधन विषयक मंत्री स्तरीय घोषणेवर चर्चा
Posted On:
04 JUL 2023 5:16PM by PIB Mumbai
मुंबई, 4 जुलै 2023
मुंबईमध्ये 4 जुलै 2023 रोजी सुरू झालेल्या G20 रिसर्च अँड इनोव्हेशन इनिशिएटिव्ह (RIIG) समिट, अर्थात G20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम परिषदेत उपस्थित प्रतिनिधींचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. श्रीवारी चंद्रशेखर यांनी स्वागत केले.
वृद्धी आणि विकासामध्ये संशोधन, विकास आणि नवोन्मेष याची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन, डॉ. चंद्रशेखर यांनी जी 20 विज्ञान प्रतिबद्धता मंत्रीस्तरीय ठरावाचा मसुदा तयार करण्यामधील सर्व G 20 सदस्य देशांच्या रचनात्मक सहभाग अधोरेखित केला.
भारताने आपल्या G 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, 2023 मध्ये ‘समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष’ या संकल्पनेखाली, संशोधन आणि नवोन्मेष (RIIG) पुढे नेला आहे. ‘समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष’ या संकल्पनेखाली 2023 मध्ये भारताने एकूण पाच संशोधन आणि नवोन्मेष (RIIG) बैठकी/परिषदा आयोजित केल्या आहेत. कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या आरआयआयजी (RIIG) स्थापना बैठकी नंतर, रांची (संकल्पना: शाश्वत उर्जेसाठी साहित्य), दिब्रुगड (संकल्पना: चक्राकार जैव-अर्थव्यवस्था), धरमशाला (संकल्पना: ऊर्जा संक्रमानासाठी पर्यावरण पूरक नावोन्मेष), आणि दीव (संकल्पना: शाश्वत नील अर्थव्यवस्था) या चार ठिकाणी आरआयआयजी बैठकी आयोजित करण्यात आल्या.
आजच्या आरआरआयजी बैठकींमधील परिणामांच्या दस्तऐवजांवर आज चर्चा आणि वाटाघाटी झाल्या. 2023 मध्ये भारताच्या G 20 अध्यक्षपदाच्या काळात भारताच्या विविध भागांमध्ये झालेल्या बैठकांच्या मालिकेमधून झालेल्या G-20 विज्ञान प्रतिबद्धतेचा, आजची बैठक हा कळसाध्याय होता.
5 जुलै 2023 रोजी मुंबईत होणाऱ्या संशोधनविषयक मंत्री स्तरीय बैठकीनंतर ठरावाचा दस्तऐवज प्रकाशित केला जाईल.
Jaydevi PS/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937290)
Visitor Counter : 222