नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्‍थेच्या(आयआरईडीए) 36 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन


आयआरईडीएकडून आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सर्वाधिक कर्ज मंजुरी, कर्ज वितरण, नफ्याची कमाई

Posted On: 01 JUL 2023 3:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे काल भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्‍थेची (आयआरईडीए) 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) झाली. त्यात 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा जमाखर्च मांडण्यात आला. त्यात कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीचा तपशीलही होता.

आयआरईडीएचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी कंपनीच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. " आयआरईडीए ने वार्षिक कर्ज मंजुरी, कर्ज वितरण, कर्ज पुस्तक, नफा आणि निव्वळ संपत्ती याबाबत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. " असे दास यांनी सांगितले.

त्यांनी कंपनीच्या आर्थिक वर्ष 2023 मधील कामगिरीचा धावता आढावा घेतला-

  • 32,586.60 कोटी रूपये कर्ज मंजुरी (आर्थिक वर्ष -2022 च्या तुलनेत 36.23% वाढ)
  • 21,639.21 कोटी रूपये कर्ज वितरण (आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 34.65% वाढ)
  • 47,076 कोटी रूपये कर्ज बुक (आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 38.75% वाढ)
  • करपूर्व 1,139.25 कोटी रूपये नफा आणि 864.63 कोटी रूपये करानंतरचा नफा (आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत अनुक्रमे 36.63% आणि 36.48% वाढ)
  • 5,935.17 कोटी रूपये निव्वळ संपत्ती (आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत 12.66% वाढ)
  • थकित कर्ज गुणोत्तरात (एनपीए)  सकारात्मक सुधारणा

मालमत्तेची गुणवत्ता राखण्यासाठी आयआरईडीएच्या वचनबद्धतेवर दास यांनी भर दिला. त्यांनी संरचित पुनर्प्राप्ती आणि देखरेख यंत्रणेच्या अंमलबजावणीवर प्रकाश टाकला. त्यात मासिक अंतर्गत स्थिती आढावा आणि कर्जदारांशी त्रैमासिक संवादाचा समावेश आहे. आयआरईडीएने  202.43 कोटी रूपये कर्जाची वसुली करून 18 थकित कर्ज खाती बंद केली किंवा अद्ययावत केली. या प्रयत्नांमुळे वित्तीय वर्ष 2023 च्या शेवटी एनपीए गुणोत्तरामध्ये चांगली सुधारणा झाली:

  • 3.21% सकल एनपीए, आर्थिक वर्ष 2022 मधील 5.21% वरून लक्षणीय घट
  • 1.66% निव्वळ एनपीए, आर्थिक वर्ष 2022 मधील 3.12% वरून लक्षणीय सुधारणा दर्शवित आहे

प्रभावी आर्थिक कामगिरीसोबतच, आर्थिक उत्पादनांसाठी विकसित होत असलेल्या गरजा ओळखण्यासाठी ग्रीन एनर्जी डेव्हलपर्ससोबत आयआरईडीएने सक्रिय भागीदारी केली आहे, असे दास यांनी सांगितले. नवीन उत्पादनांबद्दल जागरूकता वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे आणि ई-मोबिलिटी, ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन ट्रान्समिशन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांसाठी आधीच वित्तपुरवठा उपाय सुरू केले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1936776) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu