संरक्षण मंत्रालय

हलके लढाऊ विमान तेजसने भारतीय हवाई दलात सात वर्षांची सेवा पूर्ण केली

Posted On: 30 JUN 2023 3:04PM by PIB Mumbai

 

1 जुलै 2023 रोजी, स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान भारतीय हवाई दलातील सेवेची सात वर्षे पूर्ण करेल. 2003 मध्‍ये तेजस नाव देण्यात आलेले हे विमान विविध भूमिका पार पाडणारा प्‍लॅटफॉर्म असून त्‍याच्‍या श्रेणीत ते सर्वोत्‍तम मानले जाते.  हवाई संरक्षण, सागरी टेहळणी  आणि हल्ला करण्याची क्षमता या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे. तेजसची हाताळणी सुलभ असून ते गतिशील आहे.  मल्टी-मोड एअरबोर्न रडार, हेल्मेट माउंटेड डिस्प्ले, सेल्फ-प्रोटेक्शन सूट आणि लेझर डेझिग्नेशन  पॉडसह याची क्षमता आणखी वाढवण्यात आली आहे.

45 स्क्वाड्रन, 'फ्लाइंग डॅगर्स' ही तेजसचा समावेश करणारी पहिली आयएएफ स्क्वॉड्रन होती.  वर्षानुवर्षे स्क्वॉड्रन व्हॅम्पायर्सपासून जी नॅट  आणि नंतर मिग-21 Bis पर्यंत प्रगती करत सध्या ते स्टीडने सुसज्ज आहे. फ्लाइंग डॅगर्सद्वारे उड्डाण केलेले प्रत्येक विमानाची निर्मिती भारतात केलेली आहे  - एकतर परवाना उत्पादन अंतर्गत किंवा भारतात संरचना आणि विकसित केले आहे. मे 2020 मध्ये, 18 क्रमांकाची स्क्वाड्रन ही तेजस चालवणारी दुसरी आयएएफ युनिट बनली.

भारतीय हवाई दलाने मलेशियातील LIMA-2019, दुबई एअर शो-2021, 2021 मधील श्रीलंका हवाई दलाचा वर्धापन दिन, सिंगापूर एअर शो- 2022 आणि 2017 ते  2023 दरम्यान एअरो इंडिया शो यासह विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये विमाने प्रदर्शित करून भारताच्या स्वदेशी एरोस्पेस क्षमतांचे दर्शन घडवले  आहे.  परदेशी हवाई दलांसोबतच्या देशांतर्गत सरावांमध्ये यापूर्वीच भाग घेतला होता, मात्र मार्च 2023 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक्स-डेझर्ट फ्लॅग हा तेजसचा परदेशी भूमीवर पहिला सराव होता.

भारतीय हवाई दलाने तेजसला जो आत्मविश्वास दिला आहे तो त्याच्या 83 LCA Mk-1A व्यवस्थेत आहे ,ज्यामध्ये अद्ययावत एव्हीओनिक्स, तसेच एक सक्रिय इलेक्ट्रॉनिक रडार, अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आणि नजरेच्या पलीकडील अंतरावर मारा करण्याची  क्षेपणास्त्र क्षमता असेल. नवीन स्वरूप वाढीव  स्टँड-ऑफ रेंजमधून विविध शस्त्रास्त्रांचा मारा करण्यास सक्षम असेल. यातील अनेक शस्त्रे देशी बनावटीची असतील. LCA MK-1A मुळे विमानातील एकूण स्वदेशी सामग्रीमध्ये लक्षणीय वाढ होईल. विमानांचे कायदेशीर  वितरण फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता  आहे. आगामी  वर्षांत, हलके लढाऊ विमान आणि त्याचे भविष्यातील प्रकार भारतीय हवाई दलाचा मुख्य आधार बनतील.

***

R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936394) Visitor Counter : 405