पंचायती राज मंत्रालय

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी पंचायत विकास निर्देशांकावरील राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायत विकास निर्देशांकाचा अहवाल केला जारी


Posted On: 28 JUN 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2023

 

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे पंचायत विकास निर्देशांक (PDI) राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायत विकास निर्देशांकावरील अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

पंचायत विकास निर्देशांकावरील राष्ट्रीय कार्यशाळेत भारत सरकारच्या विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर प्रमुख भागधारकांसह 250 हून अधिक जण सहभागी झाले होते.

राष्ट्रीय कार्यशाळेचा मुख्य भर पुढील बाबींवर होता : डेटा प्रणाली तयार करण्यासाठी मंत्रालयाच्या पोर्टल/ डॅशबोर्डच्या एकत्रीकरणावर धोरणात्मक आराखडा विकसित करणे, पंचायतीमधील शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण यासह संरेखनातील योजनाबद्ध प्रगतीचे मूल्यांकन करणे आणि विविध मंत्रालये/ विभाग, पंचायत आणि ज्ञान भागीदारांच्या सहकार्याने पंचायत विकास निर्देशांकाच्या सक्रिय समर्थनासह संस्थात्मक यंत्रणा तयार करणे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पंचायती राज्याची मूळ उद्दिष्टे खऱ्या अर्थाने साध्य व्हावीत या हेतूने पंचायती राज संस्थांना (पीआरआय) भक्कम पाठिंबा देण्यासाठी गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळात आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत, असे पाटील यांनी कार्यशाळेतील उपस्थितांना संबोधित करताना अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विविध पायाभूत सुविधांच्या गरजा आणि विकासात्मक उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी पंचायती राज संस्थांना वित्तीय संसाधनांच्या वाटपातली झेप आपण सर्वांनी अनुभवली  असल्याचे ते म्हणाले. पंचायत समर्थक उपक्रमांच्या मालिकेने एका नवीन युगाची सुरुवात केली असून यामध्ये पंचायती स्वतःचे भविष्य ठरवण्यासाठी पुढे येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

कपिल मोरेश्वर पाटील यांनी आपल्या संबोधनात सर्व संबंधितांच्या सहकार्याशिवाय गावांचा सर्वांगीण विकास आणि परिवर्तन शक्य नाही यावर भर दिला. ग्रामीण भागात निश्चित कालमर्यादेत शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यासाठी पंचायतींना सतत प्रोत्साहन आणि प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले. सर्वांगीण विकासाच्या निकषांवर पंचायतींमध्ये निकोप स्पर्धा असली पाहिजे, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करता यावी यासाठी ग्रामपंचायतींनीही एकमेकांना मदतीचा हात द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंचायती राज संस्थांना बळकट आणि सक्षम करण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांचा मुख्य उद्देश पंचायती राज संस्थांमधील प्रतिनिधींची भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्यांची क्षमता वाढवणे, तसेच सर्वसमावेशक विकास, आर्थिक वाढ , कामकाजातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुधारणा यांद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करणे हाच असल्याचे कपिल मोरेश्वर पाटील म्हणाले.

  

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी पंचायत विकास निर्देशांकात भरीव योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या चमूचे प्रशस्तीपत्र प्रदान करुन कौतुक केले.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936119) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri