विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी संसदेत नॅशनल रिसर्च फाऊंडेशन विधेयक 2023 सादर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
28 JUN 2023 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज संसदेत नॅशनल रिसर्च फाऊंडेशन (एनआरएफ) विधेयक 2023 सादर करण्यास मंजुरी देण्यात आली. मंजूर विधेयकामुळे एनआरएफची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा होईल, ज्या अंतर्गत देशातील विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि विकास (आर अँड डी) चे बीजीकरण करुन त्यास वृद्धिंगत करेल आणि प्रोत्साहन देईल आणि संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीला चालना मिळेल.
हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) शिफारशींनुसार देशात वैज्ञानिक संशोधनाची उच्चस्तरीय धोरणात्मक दिशा प्रदान करणारी सर्वोच्च संस्था एनआरएफची स्थापना करेल, ज्याचा अंदाजित खर्च पाच वर्षांत (2023-28) एकूण 50,000 कोटी रुपये असेल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) हा एनआरएफचा प्रशासकीय विभाग असेल जो विविध विषयांमधील प्रख्यात संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या गव्हर्निंग बोर्डद्वारे नियंत्रित केला जाईल. एनआरएफची व्याप्ती व्यापक असल्याने - सर्व मंत्रालयांवर परिणाम करणारे - पंतप्रधान मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष असतील. एनआरएफचे कामकाज भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी परिषदेद्वारे नियंत्रित केले जाईल.
NRF उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी विभाग आणि संशोधन संस्था यांच्यात सहयोग निर्माण करेल आणि वैज्ञानिक आणि संबंधित मंत्रालयांव्यतिरिक्त उद्योग आणि राज्य सरकारांच्या सहभागासाठी आणि योगदानासाठी परस्परपूरक यंत्रणा तयार करेल. हा धोरणात्मक आराखडा तयार करण्यावर आणि नियामक प्रक्रिया राबवण्यावर लक्ष केंद्रित करेल ज्यामुळे सहकार्य आणि संशोधन आणि विकास यावर उद्योगांकडून वाढीव खर्चाला प्रोत्साहन मिळेल.
या विधेयकामुळे 2008 मध्ये संसदेच्या कायद्याने स्थापन केलेले विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ (एसईआरबी) रद्दबातल ठरेल आणि एनआरएफमध्ये समाविष्ट करेल ज्याला व्यापक आधार आहे आणि एसईआरबीच्या क्रियाकलापांव्यतिरिक्त क्रियाकलापांचा यात समावेश आहे.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935960)
Visitor Counter : 362