सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते ‘चॅम्पियन्स 2.0पोर्टल’, ‘क्लस्टर प्रकल्प, तंत्रज्ञान केंद्रांच्या जिओ-टॅगिंगसाठी मोबाइल अॅप’ आणि महिला उद्योजकांसाठी ‘एमएसएमई आयडिया हॅकाथॉन 3.0’ चा प्रारंभ
देशाच्या जीडीपी आणि निर्यातीमध्ये एमएसएमईचे महत्त्व अधोरेखित करत 2030 पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचे योगदान 50% असेल अशी राणे यांनी व्यक्त केली आशा
Posted On:
27 JUN 2023 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2023
आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनानिमित्त, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, एमएसएमईने आज नवी दिल्लीत ‘उद्यमी भारत-एमएसएमई दिवस’ साजरा केला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंह वर्मा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथी यांच्या हस्ते, एमएसएमईच्या वृद्धी आणि विकासासाठी समर्पित ‘चॅम्पियन्स 2.0पोर्टल’, ‘क्लस्टर प्रकल्प, तंत्रज्ञान केंद्रांच्या जिओ-टॅगिंगसाठी मोबाइल अॅप’ यांसारख्या एमएसएमई मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. महिला उद्योजकांसाठीच्या 'एमएसएमई आयडिया हॅकाथॉन 2.0' चे निकाल यावेळी घोषित करण्यात आले आणि 'एमएसएमई आयडिया हॅकाथॉन 3.0' ची सुरुवात करण्यात आली.
देशाच्या जीडीपी आणि निर्यातीमध्ये एमएसएमईचे महत्त्व अधोरेखित करत 2030 पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचे योगदान 50% असेल अशी आशा नारायण राणे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व हितसंबंधितांचे अभिनंदन केले आणि प्रत्येकाने भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने पावले उचलावीत, असे आवाहन राणे यांनी केले.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935751)
Visitor Counter : 211