पर्यटन मंत्रालय

गोव्यात झालेल्या जी 20 पर्यटन कार्यगटाच्या आणि मंत्रीस्तरीय बैठकीत गोवा आराखड्याला मान्यता


जी 20 बैठका आयोजित केलेल्या ठिकाणी येत्या काही दिवसांत पर्यटन मंत्रालय माईस (मिटिंग्ज, इनसेंटिव्हज, कॉन्फरन्सेस अँड एक्सिबिशन्स) पर्यटनाला देणार चालना: पर्यटन सचिव व्ही. विद्यावती

Posted On: 27 JUN 2023 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

गोव्यात 19 ते 22 जून दरम्यान झालेल्या जी 20 पर्यटन कार्यगटाच्या आणि मंत्रीस्तरीय बैठकीत गोवा रोडमॅपला मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या फलनिष्पत्तीबद्दल आज नवी दिल्लीत पत्रकारांना पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यांनी माहिती दिली. या बैठकीत जी-20 देश आणि इतर सर्व भागधारकांनी पर्यटनाचे शाश्वत उद्दिष्ट गाठण्यासाठी दृढ वचनबद्धता दाखवल्याचे त्यांनी सांगितले. हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्ये, पर्यटनविषयक  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन या गोवा आराखड्याच्या  पाच प्राधान्यक्रमांची रूपरेषा त्यांनी पुढे नमूद केली.

या पाच प्राधान्यक्रमांमुळे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी शाश्वत पर्यटनाचा रोडमॅप उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात संपूर्ण सरकारी दृष्टीकोन स्वीकारला जाईल आणि पाच प्राधान्यक्रम केंद्रीय मंत्रालये तसेच राज्य सरकारांशी सामायिक केले जातील. त्यामुळे प्रत्यक्ष कृती योजनांमध्ये त्यांचा समावेश होऊ शकेल आणि या प्राधान्यक्रमांची अंमलबजावणी करता येईल, असे त्या म्हणाल्या.

पर्यटन कार्यगटाच्या चार बैठकामध्ये झालेल्या विषयवार चर्चेचा आढावाही त्यांनी दिला. चर्चांमध्ये पुरातत्व पर्यटन, ग्रामीण पर्यटन, साहसी पर्यटन, चित्रपट पर्यटन आणि क्रूझ पर्यटन यांचा समावेश होता.

जी 20 दरम्यान भारतातील 55 हून अधिक ठिकाणी आंतरराष्ट्रीय बैठका आयोजित केल्या जात आहेत. त्यासाठी योग्य पायाभूत सुविधा निर्माण करून पुरविल्या गेल्या. यामुळे माइस पर्यटनाचा भक्कम पाया घातला गेला आहे आणि आगामी काळात पर्यटन मंत्रालयाकडून याला प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Click here for draft National Strategy for Cruise Tourism

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935732) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi