खाण मंत्रालय

धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या क्षेत्रांच्या विकासासाठी खनिजांची अशी यादी उपयुक्त ठरेल

Posted On: 27 JUN 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

केंद्र सरकारचे खनिज मंत्रालय पहिल्यांदाच ‘भारतातील महत्वाच्या खनिजांची यादी’ प्रकाशित करणार आहे. खनिजांसाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, पुरवठा साखळीतील लवचिकता  वाढवणे आणि भारताच्या शून्य उत्सर्जन उद्दिष्टप्राप्तीसाठी मदत करणे, अशा उद्देशांसाठी ही यादी प्रकाशित केली जाणार आहे. केंद्रीय कोळसा, खाणकाम आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय कोळसा, खाणकाम आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही यादी प्रकाशित केली जाईल. उद्या, म्हणजे 28 जून 2023 रोजी नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल सेंटर इथे हा कार्यक्रम  होणार आहे.

या कार्यक्रमाला काही परदेशी पाहुणे, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, या विषयातील तज्ज्ञ  आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहतील. यावेळी महत्वाच्या खनिजांच्या यादीची ठळक वैशिष्ट्ये एका छोट्या महितीपटाच्या माध्यमातून दाखवली जातील. तसेच महत्वाची खनिजेदेखील यावेळी दाखवली जातील.

खनिज स्त्रोत क्षेत्रात स्वयंपूर्णता आणि सुरक्षा आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये ही यादी एक मैलाचा दगड ठरणार आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक संकलित करण्यात आलेल्या या यादीची रचना, खनिजांची ओळख पटणे आणि विविध उद्योग क्षेत्रातील त्यांच्या आवश्यकतेनुसार, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवणे अशा पद्धतीची आहे. यात उच्च तंत्रज्ञानयुक्त इलेक्ट्रॉनिक्स, टेलि कम्युनिकेशन्स, वाहतूक आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. ही यादी, खाणकाम क्षेत्रातील धोरणनिर्मिती, धोरणात्मक नियोजन आणि गुंतवणूकविषयक निर्णय घेण्यासाठी एक मार्गदर्शन आराखडा म्हणून उपयुक्त ठरेल. त्याशिवाय, हा उपक्रम, एक भक्कम आणि चिरकाल टिकून राहणारे खनिज क्षेत्र निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी, ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी देखील कामी येईल. महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळ्यांना बळ देण्यासाठी, भारत अलीकडेच प्रतिष्ठित अशा  खनिज सुरक्षा भागीदारी (MSP) मध्ये सर्वात नवीन भागीदार बनला आहे, हे इथे विशेष उल्लेखनीय !

 

* * *

S.Kakade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935614) Visitor Counter : 138