निती आयोग
युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये भारतातील 9 राज्यांमधील बारा स्टार्ट-अप ठरले विजेते
विजेत्या 12 स्टार्ट-अप्सना त्यांच्या अभिनव कल्पना साकारण्यासाठी 5,000 डॉलर्स पर्यंत प्रारंभिक निधी मिळाला
Posted On:
27 JUN 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2023
युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग इंडियाच्या 5व्या आवृत्तीत कृषी, शिक्षण-तंत्रज्ञान, महिलांसाठी उपजीविका, चक्राकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधता या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतातील 9 राज्यांमधील बारा अव्वल स्टार्ट-अप्सना विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि सिटी फाउंडेशन द्वारा 2017 मध्ये संयुक्तपणे निर्मित यूथ को: लॅबचा उद्देश युवकांना सशक्त बनवणे आणि त्यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार करणे हा आहे जेणेकरून ते नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती देऊ शकतील.
भारतात 2019 मध्ये अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीति आयोग यांच्या भागीदारीतून युथ को:लॅबचा प्रारंभ झाला. 2022-23 आवृत्तीसाठी देशभरातील 28 राज्यांमधून 378 अर्ज प्राप्त झाले.
एआयएमचे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव; यूएनडीपी इंडियाच्या निवासी प्रतिनिधी शोको नोडा आणि अभिनेत्री आणि यूएनडीपी चॅम्पियन संजना संघी यांनी विजेत्यांना सन्मानित केले.
बारा स्टार्ट-अप्स विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 4 स्टार्ट-अप्सचा समावेश आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी संधी निर्माण करणारे पुणे स्थित संस्थापक आकाशदीप बन्सल यांचे SaralX, महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारा मुंबईतील संस्थापक सौम्या डबरीवाल यांचा प्रोजेक्ट बाला (Project Baala), महाराष्ट्रात महिला शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण संबंधी उपाय सुचवणारा संस्थापक अक्षय दीपक कावळे यांचा ऍग्रोशुअर (Agrosure) आणि कमी कार्बनच्या शाश्वत पर्यायांवर खर्च करण्यास प्रोत्साहन देणारा संस्थापक रजत सोहन विश्वकर्मा यांचा मुंबईतील मायप्लॅन 8 (Myplan 8) यांचा समावेश आहे.
युथ को:लॅब
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि सिटी फाउंडेशन द्वारा 2017 मध्ये संयुक्तपणे निर्मित यूथ को: लॅबचा उद्देश युवकांना सशक्त बनवणे आणि त्यांच्यात गुंतवणूक करण्यासाठी आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी एक सामायिक अजेंडा तयार करणे हा आहे जेणेकरून ते नेतृत्व, सामाजिक नवोन्मेष आणि उद्योजकता याद्वारे शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीला गती देऊ शकतील. युथ को:लॅब बाबत अधिक माहिती येथे मिळेल.
* * *
S.Kakade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935604)
Visitor Counter : 150