गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून स्वागत
इजिप्तने मोदीजींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ नाईल पुरस्कार' देऊन गौरवल्यामुळे, जागतिक वलय लाभलेले राजकीय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना मिळालेले यश आता आणखी एका सन्मानाने उजळून निघाले आहे
इतर देशांकडून असे जास्तीत जास्त पुरस्कार प्राप्त झालेले मोदी जी हे भारताचे एकमेव पंतप्रधान
Posted On:
25 JUN 2023 6:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या इजिप्तच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाचे, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी स्वागत केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणतात की, “ इजिप्तने मोदीजींना आपल्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान 'द ऑर्डर ऑफ नाईल पुरस्कार' देऊन गौरवल्यामुळे, जागतिक वलय लाभलेले राजकीय नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना मिळालेले यश आता आणखी एका सन्मानाने उजळून निघाले आहे. इतर देशांकडून असे जास्तीत जास्त पुरस्कार मिळवणारे मोदी जी भारताचे एकमेव पंतप्रधान ठरले आहेत."
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935249)
Visitor Counter : 219