संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस तरकश ची मस्कतला भेट. (19-22 जून 23)

प्रविष्टि तिथि: 24 JUN 2023 7:25PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या आयएनएस तरकश या जहाजाने 19 ते 22 जून 2023 या कालावधीत  ओमानमधील मस्कत बंदरात मुक्काम केला. या भेटीदरम्यान, या जहाजाने ओमान मधील मस्कत येथील भारतीय दूतावासाच्या समन्वयाने 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 चा भाग म्हणून भारत सरकारच्या 'ओशन रिंग ऑफ योग' या उपक्रमा अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेतले.

21 जून रोजी, भारतीय दूतावासाने ओमान मधील मस्कत येथील इंडियन स्कूल मस्कत येथे आयोजित केलेल्या ओमान योग यात्रेत या जहाजाचे कमांडिंग ऑफिसर आणि कर्मचारी सहभागी झाले होते. ओमानमधील भारताच्या दूतावासाने कार्यक्रमस्थळी योग सुरू होण्‍यापूर्वी आयएनए तरकशच्या कमांडिंग ऑफिसरचा सत्कार केला. या कार्यक्रमात सुमारे 2000 जण सहभागी झाले.

या बंदर भेटीदरम्यान, जहाजावरील चमूने ओमानच्या सशस्त्र दलाच्या सुलतानाशी संवाद साधला. त्याचबरोबर ओमान मधील मस्कत येथील सुलतानाच्या सशस्त्र सेना संग्रहालय आणि सागरी सुरक्षा केंद्राला भेट दिली.

भारतीय नौदल आणि ओमानची रॉयल नेव्ही यांच्यात मैत्रीचे घनिष्ट संबंध असून या भेटीदरम्यानही हे दृढ नाते ठळक दिसून आले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1935070) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Punjabi , English , Urdu