गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज श्रीनगरमध्ये सुमारे 586 कोटी रुपयांच्या 84 विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी


मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळातील स्तरावर लोकाभिमुख शासन व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

आज येथे शाळा, महाविद्यालये, उद्योग सुरू आहेत, 2022 मध्ये 1.88 कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

जम्मू-काश्मीरमधील युवकांना  परिवर्तनात सहभागी होण्याचे आवाहन करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, हातात लॅपटॉप घेऊन जम्मू-काश्मीर आणि देशाच्या विकासात सामील होण्यातच भविष्य आहे, शस्त्र घेऊन नव्हे

Posted On: 23 JUN 2023 8:57PM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज श्रीनगरमध्ये सुमारे 586 कोटी रुपयांच्या 84 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001HFRP.jpg

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या प्रवासात एक नवा टप्पा गाठला गेला आहे. आज येथे सुमारे 586 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले असून सुमारे 22 लाख लोकांना त्याचा लाभ होणार असून त्यांचे दैनंदिन जीवन सुखकर होणार आहे असे ते म्हणाले. पिण्याचे शुद्ध पाणी घरापर्यंत पोहोचते तेव्हा दूर अंतरावरून  पाणी आणणाऱ्या महिलेची समस्या तर दूर होतेच, मात्र त्याशिवाय संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यात दर्जात्मक सुधारणा होते असे शाह म्हणाले.  त्याचप्रमाणे काश्मीर खोऱ्यातील मुले आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी देशातील इतर शाळांच्या बरोबरीने 100 शाळांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील विशेषत: खोऱ्यातील लोकांना आनंदी जीवनाचा अधिकार देण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002KFLN.jpg

अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू आणि काश्मीरच्या कोणत्याही नागरिकाच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची काळजी घेत आहे. ही योजना देशभरातील गरीबांसाठी लागू करण्यात आली आहे , मात्र जम्मू आणि काश्मीरसाठी, पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेला सेहत योजनेशी जोडून केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक नागरिकाला यात समाविष्ट केले आहे असे ते म्हणाले.  गेल्या 5 वर्षांत  मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळाच्या स्तरावर लोकाभिमुख शासन व्यवस्था ठेवण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BMSU.jpg

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये लाखो नागरिकांनी विविध छोट्या छोट्या योजनांचा लाभ घेतला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू-काश्मीरमधील 12.45 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा करतात, जेणेकरून त्यांना कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना तीन वर्षात 100 कोटी रुपये प्राप्त झाले,तर डीबीटी योजनेंतर्गत  मागील चार वर्षात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 23,000 कोटी  रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला एम्स, आयआयएम, आयआयटी आणि आयआयआयटी सारख्या संस्था दिल्या. सरकारला दल सरोवर हे देशातील सर्वात आकर्षक पर्यटन केंद्र बनवायचे आहे, आणि त्यासाठी 85 कोटींची तरतूद प्राथमिक सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. येत्या काही दिवसांत देशभरातील मुलांना डल लेक आणि टॅटू ग्राउंडला भेट द्यायला आवडेल. ते म्हणाले की, जगभरातील पर्यटक तेव्हाच या प्रदेशाला भेट देतील जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या बदलांची योग्य प्रकारे माहिती दिली जाईल आणि यासाठी जी-20 हे एक मोठे व्यासपीठ आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पंचायती राज व्यवस्थेअंतर्गत निधी आता थेट पंचायतीकडे जात आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गावाचा विकास करण्याचा अधिकार मिळाला आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी, विशेषतः खोऱ्यातील तरुणांनी पुढे येऊन परिवर्तनाच्या प्रक्रियेचे नेतृत्व केले पाहिजे आणि जम्मू-काश्मीरला नवीन ध्येये आणि उंचीवर नेण्यासाठी काम केले पाहिजे. त्यांनी घाटीतील तरुणांना सांगितले की, जे तरुण हातात दगड आणि शस्त्रे ठेवतात ते आपले हितचिंतक कदापि असू शकत नाहीत. त्यांनी तरुणांना सांगितले की, परिवर्तन त्यांची वाट पाहत आहे आणि संपूर्ण देश त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे, खोऱ्यातील तरुणांसाठी संपूर्ण जगाची बाजारपेठ खुली असल्याचे त्यांनी तरुणांना सांगितले. तरुणांनी पुढे यावे आणि या परिवर्तन यात्रेत सहभागी व्हावे तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन काश्मीरच्या उभारणीचा संकल्प पूर्ण करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, जे बदल शोधत नाहीत ते तरुणांच्या हिताच्या विरोधात आहेत. जग पुढे जात आहे आणि आता जम्मू-काश्मीरनेही देश आणि जगासोबत चालण्याची वेळ आली आहे, असे अमित शाह म्हणाले.

 

***

R.Aghor/S.Kane/P.Kor


(Release ID: 1934908) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Manipuri