गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
शहरव्यापी स्वच्छता मोहिमेमुळे सर्वसमावेशक स्वच्छतेला चालना मिळत असून शहरांचे चित्र बदलत आहे
'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन भारत वाटचाल करत आहे
Posted On:
23 JUN 2023 12:15PM by PIB Mumbai
स्वच्छ भारत अभियानात शाश्वत स्वच्छता उपायांवर भर दिला जात असल्यामुळे स्वच्छतेबाबतच्या प्रसारात सुधारणा झाली आहे. दाट लोकसंख्या आणि शहरी विस्तारामुळे शहरात, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अधिक आव्हानात्मक असते. मात्र, आता शहरव्यापी सर्वसावेशक स्वच्छता (CWIS) मोहिमेमुळे वाढत्या शहरी भागात स्वच्छतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत होते आहे. या मोहिमेमुळे शहरांमध्ये अधिक व्यापक, प्रभावी आणि शाश्वत स्वच्छता सेवा प्राप्त करण्यासाठी सध्या वापरात असलेले स्वच्छता विषयक तंत्रज्ञान आणि चांगल्या पद्धती शोधून काढण्यास ही मदत होते आहे. या शहरव्यापी स्वच्छता मोहिमे मागील (CWIS) दृष्टिकोनाचा परिणाम असा आहे की, यामुळे शहरी भागातील प्रत्येकाला पुरेशा आणि शाश्वत स्वच्छता सेवांचा लाभ मिळतो आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील, स्वयंसहाय्यता गट (SHGs) आणि तृतीयपंथी गट मोठ्या प्रमाणात विकेंद्रित घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन मूल्य शृंखलेमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहेत, जे स्वच्छता क्षेत्रातील प्रमुख सेवा प्रदाते म्हणून उदयास आले आहेत. ओडिशा, केरळ आणि इतर राज्यांनी महिला किंवा ट्रान्सजेंडर सदस्यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वयंसहायता गटांना या सेवा सुपूर्द केल्या आहेत.

महाराष्ट्रात, सिन्नर नगरपरिषदेने (SMC) सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (CWAS), सीईपीटी (CEPT) विद्यापीठाच्या मदतीने स्थानिक महिला स्वयं- सहाय्यता गटाला (SHG) आपल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पाचे (GWTP) संचालन आणि देखभालीसाठी सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिन्नर नगरपरिषदेने (SMC) या प्रकल्पाचे दैनंदिन संचालन आणि देखभाल करण्यासाठी तसेच बागांच्या देखभालीसाठी प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा वापरण्यासाठी स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटाची नियुक्ती केली आहे. या उपक्रमामुळे, सिन्नर नगरपरिषद (SMC) केवळ आपल्या नव्याने विकसित केलेल्या पायाभूत सुविधा यंत्रणा शाश्वत रीतीने जपून ठेवण्यात यशस्वी झाली नाही तर या नगर परिषदेने महिलांसाठी अर्थपूर्ण उपजीविकेच्या संधी निर्माण करून महिलांना सक्षम बनवले आहे.

या सर्व शहरांनी आपल्या कृतीतून हेच दाखवून दिले आहे की अपारंपरिक, तरीही सर्वसमावेशक उपक्रम जटिल अशा स्वच्छता आणि सामाजिक समस्यांना कशाप्रकारे उत्तम हाताळू शकतात. शहरी भारतात, स्वच्छता सेवा या आर्थिकदृष्ट्या, पर्यावरणीय दृष्टिकोनातून आणि तांत्रिकदृष्ट्या टिकून राहणे आवश्यक आहे. म्हणूनच, अशी शहरे आणि राष्ट्रीय स्वच्छता धोरणे, विविध पद्धती आणि होणारी गुंतवणूक, अगदी शौचालयापासून ते त्यावरील उपायांपर्यंत तसेच पुनर्वापर किंवा विल्हेवाट लावण्यासाठीच्या एकंदरीत स्वच्छता सेवा साखळी हाताळण्यात मार्गदर्शक ठरतात.

***
R.Aghor/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934765)
Visitor Counter : 189