विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जोहा तांदूळ - मधुमेह व्यवस्थापनात पौष्टिक पर्याय

Posted On: 23 JUN 2023 2:21PM by PIB Mumbai

 

जोहा तांदूळ हा भारताच्या ईशान्येकडील प्रदेशात लागवड केलेला सुगंधी तांदूळ असून रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि मधुमेहाला रोखण्यात  प्रभावी आहे आणि म्हणूनच मधुमेहाच्या  व्यवस्थापनात एक प्रभावी पौष्टिक पर्याय  आहे.

जोहा तांदूळ  हे हिवाळ्यातील खरीप धान्य आहे जो त्याच्या सुगंध आणि उल्लेखनीय चवीसाठी ओळखला जातो. पारंपारिक दावे केले जातात की जोहा तांदळाचा आहारात समावेश असलेल्यांमध्ये मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा प्रादुर्भाव कमी आहे, मात्र यासाठी वैज्ञानिक प्रमाणीकरण आवश्यक होते.

त्या दिशेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड  स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधील शास्त्रज्ञांनी सुगंधी जोहा तांदळाच्या पौष्टिक गुणधर्मांचा शोध लावला.

राजलक्ष्मी देवी आणि परमिता चौधरी यांनी त्यांच्या संशोधनात सुगंधी जोहा तांदळाच्या पौष्टिक गुणधर्मांचा शोध लावला. इन विट्रो प्रयोगशाळेतील विश्लेषणाद्वारे, त्यांना लिनोलिक ऍसिड (ओमेगा -6) आणि लिनोलेनिक (ओमेगा -3) ऍसिड ही दोन अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळली.  ही अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् (जी मानव निर्माण करू शकत नाही) विविध शारीरिक स्थिती राखण्यात  मदत करू शकतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिड मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोग यांसारख्या अनेक चयापचय संबंधित आजारांना प्रतिबंध करते. जोहा रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि डायबेटिक ऋग्ना रुग्णमधील मधुमेह रोखण्यासाठी देखील प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या बिगर -सुगंधी तांदळाच्या  तुलनेत सुगंधित जोहा तांदूळमध्ये  ओमेगा -6 आणि ओमेगा -3 अधिक संतुलित प्रमाणात आहे असे संशोधकांना  आढळले आहे. योग्य आहार राखण्यासाठी मानवाला आवश्यक असलेले ओमेगा -6 आणि ओमेगा -3 या आवश्यक फॅटी ऍसिडचे (ईएफए) प्रमाण साधारण  एक इतके आहे. त्यांनी या जोहा तांदळाचा वापर राईस ब्रॅन तेल हे एक पेटंट उत्पादन  बनवण्यासाठी केला आहे, जे मधुमेह व्यवस्थापनात प्रभावी आहे असा त्यांनी दावा केला आहे.

याशिवाय, जोहा तांदूळ अनेक अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फेनोलिक्सने समृद्ध आहे. यामध्ये  ओरिझानॉल, फेरुलिक ऍसिड, टोकोट्रिएनॉल, कॅफीक ऍसिड, कॅटेच्युइक ऍसिड, गॅलिक ऍसिड, ट्रायसिन सारखी अनेक बायोएक्टिव्ह संयुगे आहेत ज्यात अँटिऑक्सिडंट, हायपोग्लाइसेमिक आणि कार्डिओ-प्रोटेक्टिव्ह  गुणधर्म आहेत.

Graphical abstract: Joha as a nutraceutical in type-II diabetes.

***

R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934762) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali