ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

भारतीय मानक ब्युरोने कृषी उप-उत्पादनापासून बनवण्यात येणाऱ्या भांड्यांसाठी मानक IS 18267: 2023 केले सादर

Posted On: 22 JUN 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2023

 

भारतीय मानक ब्युरो (BIS) ने IS 18267: 2023 "कृषी उप-उत्पादनांपासून बनवली जाणारी अन्नपदार्थ देण्यासाठीची भांडी तयार करण्याचे तपशील," प्रकाशित केले आहेत. प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी करणे आणि शाश्वततेला चालना देण्याच्या उद्देशाने हे मानक तपशील प्रकाशित करण्यात आले आहेत. या उत्पादनांच्या देशभरातील गुणवत्तेच्या आवश्यकतांमध्ये एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी ही मानके उत्पादक आणि ग्राहकांना सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात.

या मानकाच्या अंमलबजावणीचे व्यापक फायदे आहेत. कारण, बायोडिग्रेडेबल कृषी उप-उत्पादन असलेली भांडी वापरल्याने पर्यावरण सुरक्षितता, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. ही भांडी हानिकारक पदार्थांपासून मुक्त आहेत आणि ते ग्राहकांचे कल्याण सुनिश्चित करतात. हे मानक शेतकऱ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करते आणि शाश्वत कृषी पद्धतींना समर्थन देऊन ग्रामीण विकासाला हातभार लावते.

भारतात असंख्य मोठे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) स्तरावरील उत्पादक बायोडिग्रेडेबल कटलरीच्या उत्पादनात सक्रियपणे योगदान देत आहेत आणि त्यांना या मानकाचा खूप फायदा होणार आहे. या उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात गुंतलेल्या उत्पादकांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे.

या मानकामध्ये बायोडिग्रेडेबल भांड्यांच्या उत्पादनासाठी कच्चा माल, उत्पादन तंत्र, कार्यक्षमता आणि स्वच्छता आवश्यकता यासह विविध पैलूंबाबतच्या माहितीचा समावेश आहे. हे मानक जेवणासाठी लागणाऱ्या थाळ्या, कप, वाट्या आणि यासारखी भांडी बनवण्यासाठी प्राधान्यकृत साहित्य म्हणून झाडांची पाने आणि आवरणांसारख्या कृषी उप-उत्पादनांचा वापर निर्दिष्ट करते.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934643) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu