संरक्षण मंत्रालय
राष्ट्रपतींनी, लष्करी परिचर्या सेवेच्या मेजर जनरल स्मिता देवराणी आणि ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार केले प्रदान
Posted On:
22 JUN 2023 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2023
सशस्त्र दलाच्या सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान केले. लष्करी परिचर्या सेवेच्या (एमएनएस) अतिरिक्त महासंचालक (एडीजी) मेजर जनरल स्मिता देवराणी आणि ब्रिगेडियर एमएनएस, मुख्यालय, दक्षिणी कमांड ब्रिगेडियर अमिता देवराणी यांना हे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार अनुक्रमे 2022 आणि 2023 वर्षांसाठी प्रदान करण्यात आले आहेत. नवी दिल्ली येथे आज 22 जून 2023 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 मध्ये राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराची सुरुवात केली.
परिचारिका आणि परिचर्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी समाजासाठी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. देवराणी भगिनींना देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या चार दशकांच्या उल्लेखनीय योगदान आणि सेवेचा सन्मान आहे.
मेजर जनरल स्मिता देवराणी यांची 1983 मध्ये एमएनएस मध्ये नियुक्ती झाली.
ब्रिगेडियर अमिता देवराणी यांची 1986 मध्ये सेवेत नियुक्ती झाली. त्यांनी 01 सप्टेंबर 2021 रोजी ब्रिगेडियर एमएनएस, दक्षिण कमांड म्हणून त्यांची सध्याची नियुक्ती स्वीकारली. प्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, सशस्र दल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे; नर्सिंग महाविद्यालय, लष्करी रुग्णालय, संशोधन आणि संदर्भ आणि उपप्राचार्य, नर्सिंग महाविद्यालय, भारतीय नौदल रुग्णालय जहाज (आयएनएचएस) अश्विनी अशा विविध महत्त्वाच्या पदांवर यापूर्वी त्यांनी काम केले आहे. दोन्ही बहिणी उत्तराखंडमधील कोटद्वार जिल्ह्यातील आहेत.
* * *
N.Chitale/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934547)