सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

जागतिक सिकलसेल जनजागृती दिन साजरा

Posted On: 20 JUN 2023 12:10PM by PIB Mumbai

 

सिकलसेल आजार (SCD) आणि त्याचा जगभरातील व्यक्ती, कुटुंब आणि समुदायांवर होणारा परिणाम याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 19 जून रोजी जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस साजरा केला जातो. जागतिक सिकलसेल समुदायांची निर्मिती आणि बळकटीकरण, नवजात बालकांची तपासणी तसेच तुमच्या सिकलसेल आजाराची स्थिती जाणून घेणेही यंदाच्या जागतिक सिकलसेल दिनाची संकल्पना आहे. सिकलसेल आजाराशी लढा देण्यासाठी बालके आणि प्रौढांमधील जनुकीय गुणधर्म समजून घेण्याची पहिली पायरी ओळखणे ही संकल्पनेचा उद्देश आहे.  सिकलसेल आजाराची स्थिती ओळखण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही ही संकल्पना आग्रही आहे.  केन्द्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा दिव्यांग व्यक्तींचे सशक्तीकरण विभाग, देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्व विकासात्मक उद्दिष्टांवर लक्ष ठेवणारी प्रमुख (नोडल) संस्था आहे. विभागानेजनसामान्यांमध्ये सिकलसेल आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, विविध उपक्रमांद्वारे जागतिक सिकलसेल जनजागृती दिन साजरा केला. यात राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आणि कार्यशाळा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा कार्यक्रम, वेबिनार, निबंध आणि फलक बनवणे अशा  विविध कार्यक्रमांचा समावेश होता. विभागाने आपल्या विविध संस्थांमार्फत देशभरात 30 पेक्षा जास्त ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन केले होते.

***

S.Kane/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933590) Visitor Counter : 212