आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्वांगीण आरोग्याला चालना दिल्याबद्दल अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेची परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याकडून प्रशंसा

Posted On: 17 JUN 2023 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली. यावेळी लोकसभेचे खासदार रमेश बिधुरी, नवी दिल्लीतल्या बदरपूरचे आमदार रामवीर सिंग बिधुरी, आयुष मंत्रालयाचे विशेष सचिव प्रमोद कुमार पाठक, आयुष मंत्रालयाचे सल्लागार मनोज नेसारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. एस जयशंकर यांनी, साथरोगाच्या सुरूवातीपासून प्रतिबंधात्मक उपायांकडे जागतिक स्तरावर झालेल्या बदलावर प्रकाश टाकला. “जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक स्तरावर निरोगीपणाच्या समग्र संकल्पनेला चालना देण्यासाठी पारंपारिक औषधांसाठी जागतिक केंद्र स्थापन करण्याची शिफारस केली आहे, असेही जयशंकर यांनी सांगितले. भारताने या जबाबदारीचे महत्त्व ओळखून गुजरातमध्ये जामनगर येथे ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना करून या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. आम्ही दिल्लीतील रहिवाशांना गेल्या 9 वर्षांचे साक्षीदार राहिलेल्या उल्लेखनीय परिवर्तनाची आठवण करून देऊ इच्छितो. या काळात ज्या अगणित जीवनांवर सकारात्मक परिणाम झाला आहे, त्याचा, ही संस्था एक जिवंत पुरावा आहे. 20 वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत राहिल्यानंतर, हा प्रकल्प केवळ सुरूच झाला नाही तर दररोज हजारो लोकांना बरे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच आयुर्वेदाला सध्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे."

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. तनुजा नेसारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण आयुर्वेदाचे एम्स (AIIMS) म्हणून संबोधतो, त्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे उद्घाटन, 2017 मध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. आम्ही पुराव्यावर आधारित उपचार पद्धती चालवतो आणि आजपर्यंत 54 सामंजस्य करारांवर यशस्वीपणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उष्मायन (इंक्युबेशन) केंद्राची स्थापना आणि 2022 साली जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या भेटीच्या वेळी आपल्या सर्व आदरणीय पाहुण्यांचे स्वागत करण्याची अमूल्य संधी दिल्याबद्दल, त्यांनी आयुष मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले.

 

* * *

M.Pange/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1933137) Visitor Counter : 143


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu