कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
भारताची मोठी लोकसंख्या हे राष्ट्र उभारणीचे साधन ठरू शकेल . युवकांबरोबरच निवृत्ती धारक तसेच इतर ज्येष्ठ नागरिकही बलशाली आणि समृद्ध भारताच्या उभारणीसाठी आपले योगदान देऊ शकतील : केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह
Posted On:
15 JUN 2023 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2023
भारताची मोठी लोकसंख्या राष्ट्र उभारणीसाठीचे साधन ठरू शकेल असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज केले. बलशाली आणि समृद्ध भारताच्या उभारणीसाठी तरुणांबरोबरच निवृत्त झालेल्या नागरिकांसह इतर ज्येष्ठ नागरिकांनाही योगदान देता येईल असे ते म्हणाले. विज्ञान भवन येथे झालेल्या 'निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाची नऊ वर्षे' या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, भारताची 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 40 वर्षे वयाहून कमी वयोगटातील असली तरी साठ वर्षे वयाहून अधिक नागरिकांची संख्याही भारतात वेगाने वाढत आहे हे सुद्धा वास्तव आहे. साठ वर्षांहून जास्त वयोगटातील हे नागरिक निरोगी आणि कार्यक्षम तर आहेतच याशिवाय त्यांच्याकडे प्रशासन आणि विविध क्षेत्रीय कामांचा अनुभव आहे. "2047 सालातील भारत" या संकल्पासाठी त्यांना आपले योगदान देणे शक्य आहे. भारतातील निवृत्तीधारकांची संख्या ही नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त आहे आणि निवृत्तीनंतरही ते आपली बहुमूल्य सेवा देऊ करतील तर ते परिस्थिती बदलासाठीचे मोठे साधन ठरेल.
पंतप्रधानांच्या सूचनेवरून विभागाने या आधीच 'अनुभव' नामक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली आहे. हे पोर्टल आमच्यासाठी मोठा स्रोत आहे, अशी माहिती जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिली.
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने पेन्शन अदालत ही संकल्पना सुरु केली, त्याचबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल अदालत भरवणारे तंत्रज्ञानही या विभागाकडून वापरले जाते.
S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932660)
Visitor Counter : 156