दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

टीसीसीसीपीआर, 2018 अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित यूसीसी शोध यंत्रणा वापरण्यासंदर्भात ट्रायने जारी केले दिशानिर्देश

Posted On: 13 JUN 2023 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2023

ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दूरसंचार व्यावसायिक ग्राहक प्राधान्य नियम, 2018   (टीसीसीसीपीआर, 2018) अंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या आणि व्यावसायिक संवादवजा संदेश पाठवणाऱ्या संस्थांना शोधून, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित यूसीसी शोध यंत्रणा वापरण्यासंदर्भात सर्व प्रवेश प्रदात्यांना निर्देश दिले आहेत. ज्या संस्थांनी प्रवेश प्रदात्यांकडे नोंदणी केलेली नाही आणि संदेश तसेच फोन कॉलच्या माध्यमातून व्यावसायिक संवाद करण्यासाठी जे 10 आकडी मोबाईल क्रमांकांचा वापर करत आहेत त्यांना बिगर-नोंदणीकृत टेलीमार्केटर्स (यूटीएमएस)असे संबोधण्यात आले आहे.

सामान्य जनतेला त्रासदायक ठरणारा प्रमुख स्त्रोत असलेल्या अनाहूत व्यावसायिक संवादांवर (यूसीसी) अंकुश ठेवण्यासाठी ट्रायने विविध पावले उचलली आहेत. त्यामुळे नोंदणीकृत टेलीमार्केटर्स (आरटीएमएस) विरुद्ध केल्या जाणाऱ्या तक्रारी कमी झाल्या आहेत. टीएसपीएसने विविध उपाययोजना हाती घेऊनही यूटीएमएस कडून केले जाणारे यूसीसी अजूनही सुरूच आहेत. अनेकदा, यूटीएमएस कडून येणाऱ्या संदेशांमध्ये बेकायदेशीर लिंक अथवा फोन क्रमांक असतात जे ग्राहकांना त्यांची महत्त्वाची माहिती सामायिक करण्यासाठी त्यांच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यातून पुढे ग्राहकांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.

अशा यूटीएमएसना शोधून काढून, त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ट्रायने सर्व प्रवेश प्रदात्यांना ट्रायच्या टीसीसीसीपीआर, 2018 मधील आराखड्याच्या अधीन राहून यूसीसी शोध यंत्रणा वापरण्यासंदर्भात आग्रह केला आहे. प्रवेश सेवा प्रदात्यांनी त्यांच्या योग्यता आणि व्यवहार्यतेनुसार अशा शोध यंत्रणेची अंमलबजावणी सुरु केली आहे. मात्र, अनाहूत व्यावसायिक संवाद जारी ठेवण्यासाठी यूटीएमएस सतत नवनव्या तंत्रांचा वापर करत असून प्रवेश सेवा प्रदात्यांनी लागू केलेली यूसीसी शोध यंत्रणा अशा यूसीसीचा शोध लावण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही.

म्हणून, यूसीसी शोध यंत्रणा अंमलबजावणीमध्ये समानता आणण्यासाठी ट्रायने सर्व प्रवेश प्रदात्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित यूसीसी शोध यंत्रणा वापरण्यासंदर्भात आदेश दिले आहेत, कारण ही यंत्रणा यूटीएमएस द्वारे वापरल्या जाणाऱ्या नव्या स्वाक्षऱ्या, नव्या पद्धती आणि नवी तंत्रे शोधून काढण्यात सक्षम आहे. प्रवेश प्रदात्यांनी डीएलटी मंचाचा वापर करणाऱ्या इतर प्रवेश प्रदात्यांसोबत गुप्त माहिती सामायिक करावी असे देखील सांगण्यात आले आहे. अशी यूसीसी शोध यंत्रणा घाऊक प्रमाणात अनाहूत संदेश पाठवणाऱ्या आणि नियमांतील तरतुदींचे पालन न करणाऱ्या संस्था शोधून काढेल याची सुनिश्चिती करण्याचे निर्देश प्रवेश प्रदात्यांना देण्यात आले आहेत. सर्व प्रवेश प्रदात्यांनी वरील निर्देशांचे कठोरपणे पालन करावे आणि कारवाईची अद्ययावत माहिती 30 दिवसांच्या आत प्राधिकरणाकडे पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.

वरील निर्देशांच्या संदर्भात अधिक स्पष्टीकरण अथवा माहितीसाठी ट्रायचे सल्लागार (क्यूओएस)जयपाल सिंग तोमर यांच्याशी 011-23230404 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1932143) Visitor Counter : 93


Read this release in: Hindi , English , Urdu , Bengali