विशेष सेवा आणि लेख
गोव्यात साई 20 शिखर परिषदेचा समारोप, जी 20 सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांमध्ये सहकार्य आणि जबाबदारी वाढवण्याला चालना
साई 20 ठराव स्वीकारला, जी 20 देशांमध्ये राष्ट्रीय प्राधान्यक्रमांसाठी कृती-केंद्रित दृष्टीकोनाचे महत्त्व ठरावात विशद
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2023 8:46PM by PIB Mumbai
पणजी, 13 जून 2023
भारताच्या जी 20 समूह अध्यक्षतेखालील साई20 (सर्वोच्च लेखापरीक्षा संस्था) प्रतिबद्धता गटाच्या शिखर परिषदेचा आज गोव्यात समारोप झाला. कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक तसेच साई 20 प्रतिबद्धता गटाचे अध्यक्ष गिरीश चंद्र मुर्मू यांनी समारोपाचे भाषण केले.
आपल्या भाषणात मुर्मू यांनी साई 20 च्या नेत्यांचे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे आभार मानले. नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती, त्यांनी केलेल्या उत्साहपूर्ण चर्चा आणि अनुभवाची देवाणघेवाण, साई 20 ठरावाप्रति आणि चांगल्या जगासाठी असलेली त्यांची वचनबद्धता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहयोग आणि एकतेसाठी त्यांची सर्वव्यापी भावना यासाठी मुर्मू यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सामूहिकपणे साईने नील अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन युगातील क्षेत्रांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता वाढवण्याचा परिपक्व मार्ग तयार केला आहे, असे मुर्मू यांनी सांगितले. साई आणि तज्ञांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्दे, चर्चेचे बहुस्तरीय दिलखुलास स्वरूप आणि दोन प्राधान्य क्षेत्रांचा परिणाम आणि सरतेशेवटी चर्चेचे समाधान देणारे धोरणात्मक आणि अंमलबजावणीच्या पातळीवरचे आयाम यामुळे सर्वांनाच याविषयांबाबत जागरुक केले.
स्वातंत्र्याच्या कालातीत आणि अत्यावश्यक तत्त्वाच्या अनुषंगाने सुशासनाची केलेली योग्य व्याख्या आणि प्रभावी भूमिका ओळखून साई 20 सदस्यांनी जी 20 संरचनेत एक वेगळा, स्वतंत्र, संस्थात्मक मार्ग म्हणून साई 20 विषयी विचारविनिमय केला.

साई 20 निवेदनाच्या अंतिम मसुद्यावर चर्चा आणि अवलंब यावर आजच्या बैठकीत भर देण्यात आला. अंतिम साई 20 निवेदनाला एक सर्वसमावेशक, निर्णायक आणि कृती-केंद्रित दस्तावेज म्हणून सर्व सदस्यांच्या सहमतीने स्वीकारण्यात आले.
XL3V.jpeg)
बैठकीदरम्यान, नील अर्थव्यवस्था विषयी या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपली भूमिका मांडली. नील अर्थव्यवस्थाच्या विविध पैलूंबद्दल त्यांनी त्यांचे मौल्यवान ज्ञान आणि अनुभव विशद केला.

समारोप सत्रानंतर मुर्मू यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. साई 20 ने जी 20 देशांच्या कृती-केंद्रित मंचाचे प्रतिनिधित्व केले आहे यावर दोन दिवसीय बैठकीनंतर एकमत झाल्याचे मुर्मू यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट पद्धती, क्षमता बांधणी आणि योग्य ऑडिटिंग मार्गदर्शक तत्त्वांचा विकास आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांचे ऑडिट करण्यासाठी कृती करण्यायोग्य साधने याचा उल्लेख शिखर परिषदेदरम्यान स्वीकारलेल्या साई 20 ठरावामध्ये करण्यात आला.
या शिखर परिषदेत ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कोरिया, इंडोनेशिया, भारत, रशिया, सौदी अरेबिया आणि तुर्किये हे जी 20 सदस्य; बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नायजेरिया, ओमान, स्पेन आणि यूएई हे अतिथी देश; मोरोक्को आणि पोलंड हे निमंत्रित देश यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. युनायटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी) आणि जागतिक बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना तसेच आणि थिंक 20 आणि युथ 20 यासारख्या प्रतिबद्धता गटाचे प्रतिनिधीही या परिषदेत सहभागी झाले होते.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1932123)
आगंतुक पटल : 232