केंद्रीय लोकसेवा आयोग
भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2023 मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2023 चा निकाल
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2023 5:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2023
नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023 च्या माध्यमातून 28 मे 2023 रोजी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या आधारावर, पुढील अनुक्रमांक असलेले उमेदवार भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2023 मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, या सर्व उमेदवारांना भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा 2023 साठी तपशीलवार अर्ज-I (डीएएफ-I) हा अर्ज पुन्हा करावा लागेल. डीएएफ-I हा अर्ज भरण्याच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केल्या जातील.
उमेदवारांना हे देखील कळवण्यात येत आहे, भारतीय वन सेवा परीक्षा, 2023 ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच म्हणजेच अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा, 2023 च्या माध्यमातून भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत मिळालेले गुण, कट ऑफ गुण आणि उत्तरांचा संच आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने संकुल परिसरात परीक्षा भवन इमारतीजवळ एक सुविधा केंद्र स्थापन केले आहे. सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत उमेदवार या सुविधा केंद्रामध्ये वैयक्तिकरित्या जाऊन किंवा 011-23385271, 011-23098543 or 011-23381125 या दूरध्वनी क्रमांकांचा वापर करून उपरोल्लेखित परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण मिळवू शकतात. उमेदवार त्यांच्या निकालाबाबतची माहिती लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन देखील मिळवू शकतात.
निकालांसाठी कृपया येथे क्लिक करा:
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1931714)
आगंतुक पटल : 209