सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेकडून 75 व्या आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त "हमारी भाषा, हमारी विरासत" प्रदर्शनाचे आयोजन
भारतातील सर्वात जुना हस्तलिखित संग्रह असलेल्या गिलगिट हस्तलिखितांची तरुण पिढीला ओळख करून दिली पाहिजे : मीनाक्षी लेखी
Posted On:
09 JUN 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2023
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत (AKAM) 75 व्या आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेने आयोजित केलेल्या "हमारी भाषा, हमारी विरासत" या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते झाले.
हे प्रदर्शन एक राष्ट्र म्हणून भारताच्या भाषिक विविधतेच्या मौल्यवान वारशाचे स्मरण करण्याचा एक प्रयत्न आहे: “राष्ट्र एक भाषा अनेक”. भारताला विलक्षण भाषिक विविधतेचे वरदान लाभलेले आहे. जागतिक स्तरावर बोलल्या जाणार्या 7,111 भाषांपैकी सुमारे 788 भाषा एकट्या भारतात बोलल्या जातात. अशा प्रकारे पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया आणि नायजेरियासह भारत जगातील चार भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशांपैकी एक आहे.
“आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिनानिमित्त, भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने 5"-6" शतकांच्या दरम्यान लिहिली गेलेली आणि भारतात अस्तित्वात असलेली सर्वात जुनी हस्तलिखित संग्रह असलेली गिलगिट हस्तलिखिते उपलब्ध करून दिली आहेत, असे सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.बर्च झाडाच्या सालीच्या आतील थरांवर लिहिलेले बर्च बार्क फोलिओ दस्तऐवज काश्मीर प्रदेशात सापडले आहेत, असे लेखी यांनी सांगितले. या दस्तऐवजात अनेक धार्मिक - तात्विक साहित्याच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकणार्या जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रामाणिक आणि गैर-प्रामाणिक ग्रंथांचा समावेश आहे, असेही त्या म्हणाल्या. तरुण पिढीला गिलगिट हस्तलिखितांची ओळख करून दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या परिसरात सुमारे 72,000 हून अधिक हस्तलिखिते उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखी यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार संस्थेचे अभिनंदन केले. तसेच डिजिटायझेशनच्या प्रक्रियेद्वारे ही हस्तलिखिते जगभरात पोहोचतील. आणि त्यामुळे आजच्या आमच्या तरुण पिढीला या अनमोल ठेवीचा परिचय होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रदर्शनात अभिलेखीय भांडाराच्या संग्रहातील निवडक मूळ हस्तलिखिते सादर केली आहेत.(उदाहरणार्थ - बर्च बार्क गिलगिट हस्तलिखिते, तत्वार्थ सूत्र, रामायण आणि श्रीमद भगवद गीता यासारखे साहित्य यासह सरकारच्या अधिकृत फाइल्स, वसाहतवादी राजवटीच्या काळातील प्रतिबंधित साहित्य, प्रतिष्ठित व्यक्तींची खाजगी हस्तलिखिते, तसेच भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार ग्रंथालयात असलेल्या दुर्मिळ पुस्तकांच्या समृद्ध संग्रहातून निवडक साहित्य)
या प्रदर्शनात जगातील सर्वात प्राचीन गोष्टींचा समावेश आहे. ती म्हणजे नौपूर गावात (गिलगिट प्रदेश) तीन टप्प्यांत गिलगिट हस्तलिखिते शोधण्यात आली होती आणि सर्वप्रथम पुरातत्वशास्त्रज्ञ सर “ऑरेल स्टीन यांनी 1931 मध्ये घोषित केलेली हस्तलिखिते. एवढेच नाही तर या प्रदर्शनात राष्ट्रांच्या विविध भागात बोलल्या जाणार्या विविधरंगी भाषांशी संबंधित अभिलेखांच्या विशाल कोषावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1931148)
Visitor Counter : 194