आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे हे सरकारचे प्राधान्य : डॉ. मनसुख मांडविया
श्रीमंतांप्रमाणेच गरीबांना समान दर्जाची किफायतशीर आरोग्यसेवा मिळायला हवी : डॉ. मनसुख मांडविया
सीजीएचएस सुविधा असलेल्या शहरांची व्याप्ती 2014 मधील 25 शहरांवरून 2023 मध्ये 80 वर
Posted On:
09 JUN 2023 12:47PM by PIB Mumbai
भारतातील प्रत्येक नागरिकाला सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. देशात कुठेही राहणाऱ्या लोकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा .सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सीजीएचएस सुविधांचा विस्तार करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी चंदीगढ आणि पंचकुला येथील सीजीएचएस निरामय केंद्रांचे उद्घाटन करताना सांगितले.
भारतातील नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, हे डॉ. मांडवीया यांनी अधोरिखित केले. "निवृत्तीवेतनधारकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी देयके आणि प्रतिपूर्तीचे चक्र पूर्वीपेक्षा खूप सोपे करण्यात आले आहे, पुढील काळात ते अधिक जलद आणि अधिक सोपे होईल.", असे त्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. सीजीएचएस तंत्रज्ञान हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत एकीकृत करण्यात आले आहे आणि लवकरच भारतातील 100 शहरांमध्ये सीजीएचएस सुविधा विस्तारित करण्याच्या आमच्या उद्दिष्टामुळे, भारतातील लोकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मांडवीया यांनी सांगितले. "गरीबांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेची समान उपलब्धता सुनिश्चित करणे ही मोदी सरकारचे नेहमीच प्राधान्य राहिले असून आयुष्मान भारतच्या यशातून ते दिसून येते.", असे त्यांनी मोदी सरकारच्या गरीबांसाठी असलेल्या दृष्टिकोनावर भर देऊन सांगितले.
चंदीगढ आणि पंचकुला येथील सीजीएचएस निरामय केंद्र सुरु करण्यासह , सीजीएचएस सुविधा असलेल्या शहरांची व्याप्ती 2014 मधील 25 शहरांवरून 2023 मध्ये 80 पर्यंत वाढली आहे.
***
Sonali K/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930971)
Visitor Counter : 172