संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2023 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2023

पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला.  आएनएस तरकश  आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग असलेली हेलिकॉप्टर्स, फ्रेंच राफेल विमाने तसेच युएई नौदल गस्ती विमानांसह या सरावात सहभागी झाले आहेत.

दोन दिवसांच्या नियोजित सरावामध्ये नौदलाचा विस्तृत सराव आणि कामकाज होणार आहे. यात पृष्ठभागावरील युद्ध, तोफगोळ्यांचा मारा आणि पृष्ठभागावरील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रांच्या कवायती, हेलिकॉप्टर क्रॉस डेक लँडिंग ऑपरेशन्स, प्रगत हवाई संरक्षण सराव आणि जहाजावर विमाने उतरवणे आदींचा समावेश आहे. या सरावामध्ये सर्वोत्तम सरावांच्या देवाणघेवाणीसाठी कर्मचार्‍यांचे एकमेकांच्या जहाजांवर जाणे देखील समाविष्ट असेल.

तिन्ही नौदलांमधील त्रिपक्षीय सहकार्य वाढवणे आणि पारंपरिक तसेच अपारंपरिक सागरी धोके दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा करणे हा या पहिल्या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे या सागरी प्रदेशात व्यापार सुरक्षितता आणि प्रवास स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य वाढेल.

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1930828) आगंतुक पटल : 323
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil