विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू येथे CSIR-IIIM च्या अफू संशोधन प्रकल्पाची आढावा बैठकीचे आयोजन


मज्जासंस्थेचे विकार, कर्करोग आणि अपस्मार आदींसाठी निर्यातीच्या दर्जाची औषधे निर्माण करण्याची क्षमता असलेला CSIR-IIIM जम्मूचा अफू संशोधन प्रकल्प हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प : डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 08 JUN 2023 6:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2023

मज्जासंस्थेचे विकार, कर्करोग आणि अपस्मार आदींसाठी निर्यात दर्जाची औषधे निर्माण करण्याची क्षमता असलेला CSIR-IIIM जम्मूचा अफू संशोधन प्रकल्प हा भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असल्याचे, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज म्हटले आहे.  डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज CSIR-IIIM आणि जम्मू आणि कश्मीर केन्द्रशासित विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीदरम्यान डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, CSIR-IIIM आणि इंडसस्कॅन यांच्यातील वैज्ञानिक करारावर स्वाक्षरी हा केवळ जम्मू-काश्मीरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक आहे. कारण, परदेशातून निर्यात करावी लागणारी औषधे  तयार करण्याची क्षमता या संस्थेत आहे. या  प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळेल, असे डॉ. सिंह म्हणाले.

या प्रकल्पासाठी CSIR-IIIM चे कौतुक डॉ. जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले. CSIR-IIIM ही भारतातील सर्वात जुनी वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. 1960 च्या दशकात तिने पुदीन्याचे औषधी घटक शोधले, ते जांभळ्या क्रांतीचे केंद्र होते आणि आता  भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने CSIR -IIIM चा हा अफू संशोधन प्रकल्प संस्थेला अधिक प्रतिष्ठित बनवणार आहे असे म्हणाले.

अशा प्रकारच्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी, CSIR-IIIM, IIM, IIT, AIIMS इत्यादी संस्थांमध्ये समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन यात उपयोगी येणाऱ्या विविध तांत्रिक बाबी जसे की विपणन धोरणांच्या शक्यता तपासता येतील. हे काम IIM च्या माध्यमातून केले जाऊ शकते. एम्सच्या माध्यमातून क्लिनिकल चाचण्या, IIT च्या माध्यमातून तांत्रिक सहाय्य आदींची मदत होईल. कारण या सर्व संस्था जम्मूच्या काही किलोमीटर परिसरात आहेत. जे आता भारतातील शिक्षणाचे केंद्र आहे असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

बैठकीदरम्यान डॉ.जितेंद्र सिंह यांनी CSIR-IIIM, J&K DST आणि या प्रकल्पातील इतर घटकांना एक कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले. जेणेकरुन त्यातील आव्हाने आणि समस्यांचे तिथल्या तिथे निराकरण करता येईल आणि प्रकल्पाचे काम न रखडता त्याला गतीच मिळेल.

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1930827) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil