ऊर्जा मंत्रालय

इलेक्ट्रिक कुकिंगमध्ये भारताचे गतिमान संक्रमण: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ई-कूकिंग संक्रमणसंदर्भात ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन शोधण्यासाठी परिषदेचे आयोजन

Posted On: 03 JUN 2023 12:05PM by PIB Mumbai

 

5 जून 2023 रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना, भारत सरकार नवी दिल्ली येथे ई-कूकिंग संक्रमणासाठी ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन परिषद आयोजित करत आहे. या परिषदेत ऊर्जा-कार्यक्षम, स्वच्छ आणि परवडणाऱ्या ई-कूकिंग पर्यायांच्या तैनातीला गती देण्यासाठी मार्ग शोधले जातील. भारत सरकारचे उर्जा मंत्रालय, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) यांनी क्लास्प (CLASP) च्या सहकार्याने आयोजित केलेली ही परिषद संस्थात्मक ग्राहक, ग्राहक संशोधन गट, धोरण निर्माते, थिंक टँक, उत्पादक आणि इतर सक्षम गटांना इलेक्ट्रिक कुकिंगच्या दिशेने जलद संक्रमण करण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एकत्र आणेल.

ई-कूकिंग हे मिशन लाइफसाठी गुरूकिल्ली ठरणार

इलेक्ट्रिक कूकिंगवर लक्ष केंद्रित करणे हे ई-कूकिंग ही मिशन लाईफ (LiFE - पर्यावरणपूरक जीवनशैली) ची गुरुकिल्ली आहे या मान्यतेवर आधारित आहे. मिशन लाईफ हा भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जनचळवळीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मिशनमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक कृतींना प्रोत्साहन दिले जाते. 2021 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या 26 व्या कॉप 26 (COP26) राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केलेला मिशन LiFE उपक्रम लोकांना शाश्वत जीवनशैलीच्या अवलंबाचे महत्व समजावून सांगून त्यांचे वसुंधरा संवर्धक म्हणून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.

स्वच्छ स्वयंपाक ऊर्जेचा प्रवेश हा भारताच्या ऊर्जा संक्रमण प्रवासाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. स्वयंपाकाच्या इंधनाबाबत आपण केलेल्या निवडींचा भारताच्या शाश्वत अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. भारताच्या स्वच्छ स्वयंपाकाच्या दिशेने संक्रमणासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक कृती तसेच उर्जेचा वापर वाढवणारे निर्णय यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

स्वच्छ स्वयंपाक याचे आरोग्य, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे ओळखून, भारत सरकारने स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांना प्राधान्य दिले आहे, असे उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय तिवारी यांनी स्वच्छ स्वयंपाक उपक्रमाबाबत सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी बोलताना सांगितले. विद्युतीकरणात प्रचंड प्रगती होत असून नवीकरणीय ऊर्जेतून निर्माण होत असलेल्या वीज पुरवठ्याचा वाढता वाटा, इलेक्ट्रिक कुकिंग पर्याय भारताला हवामान अनुकूल, आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्याकडे नेण्याची उत्तम संधी देत आहेत., असेही ते म्हणाले.

 

"ऊर्जा-कार्यक्षम आणि परवडणारी स्वच्छ स्वयंपाक उत्पादनांचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्याची वेळ"

इंडक्शन कूकस्टोव्हच्या प्रचारासाठी कार्यक्षमतेच्या धोरण आखणीसह पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे कार्यक्षम आणि परवडणाऱ्या उत्पादनांच्या व्यापक स्वीकारास प्रोत्साहित करणे हे असल्याचे अतिरिक्त सचिवांनी निदर्शनास आणून दिले. ई-कूकिंग संक्रमण मोहीमेने ग्राहकांना धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांना जनआंदोलन निर्माण करण्यासाठी भागीदार बनवणे हे संक्रमण मोहिमेच्या केंद्रस्थान असले पाहिजे.असे त्यांनी सांगितले.

ही परिषद भारतीयांना शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करुन 'वसुंधरा संवर्धक लोक' बनण्यास मदत करते असे मत ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे महासंचालक अभय बाक्रे यांनी व्यक्त केले.ई-कूकिंग हे हरित आणि टिकाऊ पर्यावरणाचा मार्ग मोकळा करत आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेने 70 दशलक्षाहून अधिक कुटुंबांपर्यंत स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम स्वयंपाकाचे इंधन असलेल्या द्रवीभूत पेट्रोलियम गॅसच्या जोडणीचा विस्तार करून एक नवीन सुरुवात केली आहे, असेही त्यांनी सांगितले दिली. या पावलामुळे विद्युतीकरणाच्या सोबतीने ई-कूकिंगचा वापर वेगाने जलद गतीने वाढवण्याची एक मोठी संधी मिळेल. ई-कूकिंगचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने GO इलेक्ट्रिक मोहीम सुरू केली आहे." असे बकरे यांनी सांगितले.

 

ई-कुकिंग सोल्यूशन्सचा अवलंब करण्यासाठी सक्षम करणारे आणि दृष्टिकोन यावर चर्चा करण्यासाठी परिषद

इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या पुरवठ्याच्या दबावामुळे, भारताला स्वच्छ, टिकाऊ आणि परवडणारे ई-कूकिंग सोल्यूशन आवश्यक आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि ऊर्जा सुरक्षा वाढेल. ई-कूकिंग संक्रमणासाठी ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन या परिषदेत वित्त, मागणी एकत्रीकरण, कार्बन क्रेडिट्स आणि व्यापार आराखडे यांसारख्या ई-कूकिंग पर्यायांचा अवलंब करण्यासाठी सक्षमकांचा शोध घेतला जाईल. हे सक्षमक ई-कूकिंग संक्रमण घडवून आणण्यासाठी ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि वर्तन यावरही विचारमंथन करेल. या परिषदेत एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे सादरीकरण, ई-कुकिंग बाजार संक्रमण कार्यक्रम आणि ई-कूकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो द्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांवर सादरीकरण देखील केले जाईल. उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय तिवारी या परिषदेत विशेष भाषण करतील तर ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे महासंचालक अभय बाक्रे बीजभाषण करतील.

ही परिषद सलोन वेस्ट, हयात रीजन्सी, नवी दिल्ली येथे होत आहे

***

Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1929640) Visitor Counter : 149


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu