रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुजरातमधील वडोदरा येथे 48 कोटी रुपये खर्चाच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन

Posted On: 02 JUN 2023 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2023

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज गुजरातमधील वडोदरा येथे 48  कोटी रुपये खर्चाच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यात आले. दीड वर्षापूर्वी पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय महामार्ग 48 च्या अहमदाबाद-वडोदरा टप्प्यातील दुमाड चौकडीजवळ सुधारणांचे काम करण्यात आल्याचे गडकरी म्हणाले. 27.01 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुमारे 3 किमी लांबीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  यामध्ये नवीन सर्व्हिस रोड , वाहनांसाठी भुयारी मार्ग  आणि आरसीसी क्रॅश बॅरिअर्स बांधण्यात आले असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन प्रवास अधिक सुरक्षित होईल, असे गडकरी  म्हणाले.

राष्ट्राला समर्पित करण्यात येणाऱ्या 17  कोटी रुपये खर्चाच्या दुसऱ्या प्रकल्पाची लांबी सुमारे 1 किमी आहे असे ते म्हणाले. या प्रकल्पात वडोदराच्या राष्ट्रीय महामार्ग 48  देना जंक्शनजवळ अंडरपास आणि सर्व्हिस रोड बांधण्यात आला आहे असे ते म्हणाले. या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग 48 वर प्रथमच सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे वापरण्यात आले आहेत, असे सांगून ते म्हणाले की अंडरपास आणि सर्व्हिस रोडच्या पृष्ठभागावर पॉलिमर मॉडिफाईड बिटुमेनचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ते अधिक मजबूत बनतील आणि खड्ड्यांना प्रतिबंध करतील.

या बांधकामात प्रथमच 3 पदरी सर्व्हिस रोड बांधण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रकल्पांमुळे देना, हरिणी, विरोद गावांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, हे अपघात प्रवण क्षेत्र वाहतुकीसाठी सुरक्षित होईल आणि औद्योगिक परिसरातून  वाहतूक अधिक सुलभ होईल.

 

 

 N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1929496) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu