केंद्रीय लोकसेवा आयोग
सहसचिव स्तर/संचालक/उपसचिव स्तरावरील पदांसाठी कंत्राटी आधारावर ‘लॅटरल’ नियुक्ती
‘लॅटरल’ नियुक्तीद्वारे तीन सहसचिव आणि 14 संचालक/उपसचिवांना समाविष्ट केले जाणार
Posted On:
01 JUN 2023 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्र. 52/2023, दिनांक 20.05.2023 च्या अनुसार, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (DoP&T) प्राप्त झालेल्या विनंतीनुसार कंत्राटी पद्धतीने संयुक्त सचिव/ संचालक/ उपसचिव या स्तरावरील 20 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. भारत सरकारच्या खालील विभाग/ मंत्रालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने संयुक्त सचिव/ संचालक/ उपसचिव स्तरावरील अतिरिक्त 17 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय.
- उर्जा मंत्रालय
- ग्रामीण विकास विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय
- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
- वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
वरील मंत्रालये/ विभागांमध्ये ‘लॅटरल’ नियुक्ती द्वारे (दुसऱ्या कार्यालयात समान पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया) तीन सहसचिव आणि 14 संचालक/ उपसचिवांना नियुक्त केले जाईल.
उमेदवारांच्या माहितीसाठी तपशीलवार जाहिरात आणि संबंधित सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर 3 जून 2023 रोजी अपलोड केल्या जातील. इच्छुक उमेदवार 3 जून 2023 ते 3 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.
उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी त्यांची निवड केली जाईल. उमेदवारांनी ही सर्व माहिती खरी असल्याची ग्वाही देते आवश्यक आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929121)
Visitor Counter : 111