निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीती (NITI) आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाने आयोजित केली धोरण चर्चेवरील स्टार्टअप 20 दूतावास बैठक

Posted On: 30 MAY 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

जागतिक स्टार्टअप परिसंस्थेमधील नव्या युगाचे द्योतक म्हणून स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाने आज नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत दूतावास बैठक आयोजित केली होती. G20 देशांच्या नेतृत्वाकडून प्रभावी प्रतिसाद मिळावा या एकमेव उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेली ही बैठक जगभरातील स्टार्टअप्सचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा आहे.

डेन्मार्क, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, यूएसए, युरोपियन युनियन (ईयू), ब्राझील, ओमान, कॅनडा, इंडोनेशिया, मेक्सिको आणि एस्टोनिया यांसारख्या देशांमधील सन्माननीय प्रतिनिधी, संबंधित देशांमधील स्टार्टअप्स च्या विकासाला आणि यशाला चालना देणारी धोरणे तयार करण्यामध्ये सक्रिय सहभागी झाले.     

जानेवारी मधील स्थापना बैठक आणि मार्च 2023 मध्ये सिक्कीम सभेदरम्यान मिळालेला प्रचंड  पाठींबा लक्षात घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमधून, 3 आणि 4 जून  2023 रोजी गोवा येथे अपेक्षित असलेली बैठक आणि त्यापाठोपाठ 4 आणि 5 जुलै 2023 रोजी गुरूग्राम येथे होणाऱ्या अंतिम बैठकीचा मार्ग मोकळा झाला.  

बैठकीमधील सहभागींना पहिल्या सार्वजनिक धोरण चर्चेच्या मसुद्यावर आपली मते मांडण्याची आणि त्यामध्ये भर घालण्याची संधी मिळाली, जे सर्वसमावेशक चर्चा प्रक्रीये द्वारे प्राप्त झालेल्या धोरण शिफारशींचे प्रतिनिधित्व करते. या प्रक्रियेमध्ये भारत, G20 देश आणि आमंत्रित देशांच्या स्टार्टअप परिसंस्थेतील विविध भागधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 500 पेक्षा जास्त  प्रतिनिधींबरोबरच्या प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य माध्यमातील बैठकांचा समावेश होता.

स्टार्टअप 20 दूतावासाच्या विशेष बैठकीने विविध देशांमधील स्टार्टअप संबंधित कार्यक्रमांसाठीचे दायित्व   असलेल्या प्रतिनिधींना एकत्र आणले. त्यांचे एकत्रित ज्ञान आणि शिफारशी आणि धोरण निर्देशांवरील चर्चेतील सक्रीय सहभागाचे उद्दिष्ट म्हणजे, एक मजबूत जागतिक स्टार्टअप परिसंस्था निर्माण करणे, हे आहे.  

सहभागी देश, धोरण चर्चेचा दस्त ऐवज संबंधित देशांमधील प्रत्यक्ष भागधारकांपर्यंत कसे पोहोचवू शकतील, हा या बैठकीचा ठळक मुद्दा होता. त्याशिवाय, स्टार्टअप परीसंस्थेमधील G20 देशांचे नेतृत्व धोरणाच्या मसुद्याला अंतिम रूप देण्यामध्ये कसे योगदान देऊ शकते, यावरही बैठकीत चर्चा झाली. तसेच, जी 20 देशांद्वारे धोरण चर्चेच्या मसुद्यावर सामाईक सहमतीबाबत कराराची मागणी करण्यात आली.

"G20 स्टार्टअप 20 दूतावास बैठकीमध्ये दूतावासाच्या प्रतिनिधींचा असा उत्साहपूर्ण सहभाग पाहून आम्हाला आनंद वाटत आहे", स्टार्टअप 20 चे अध्यक्ष डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले. “त्यांचा मोलाचा दृष्टीकोन आणि योगदान जगभरातील स्टार्टअप्सच्या वाढीला आणि यशास चालना देण्यासाठी महत्वाचा ठरेल. आमचा विश्वास आहे की या एकत्रित प्रयत्नांमधून आकाराला आलेली धोरणे एक गतिशील आणि समृद्ध  जागतिक स्टार्टअप परीसंस्थेसाठी व्यासपीठ तयार करतील."

G20 स्टार्टअप 20 दूतावास बैठकीच्या स्टार्टअप 20 धोरण चर्चा बैठकीचे यश स्टार्टअप परिसंस्थेमधील पुढील सहयोग आणि प्रगतीचा टप्पा निश्चित करेल.

जगभरातील स्टार्टअप परीसंस्थेची रचना आणि पुढील प्रगतीसाठी मानक निश्चित करणे, हे G20 अंतर्गत प्रथमच स्थापन करण्यात आलेल्या स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाचे उद्दिष्ट आहे.  

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928422) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi