इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आयटी हार्डवेअर करिता पीएलआय 2.0 अंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मागवले अर्ज

Posted On: 30 MAY 2023 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मे 2023

 

आत्मनिर्भर भारत अंतर्गत, भारताची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 मे 2023 रोजी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राच्या हार्डवेअरसाठी उत्पादन-आधारित अनुदान (पीएलआय) योजना 2.0 लागू करण्यासाठी मंजुरी दिली.

या योजनेची अधिसूचना 29 मे 2023 रोजी जारी करण्यात आली असून, आयटी हार्डवेअर साठी पीएलआय योजना 2.0 अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया 01 जून 2023 रोजी सुरु  होणार आहे.  

आयटी हार्डवेअर साठीच्या पीएलआय योजना 2.0 मुळे हार्डवेअरचे सुटे भाग आणि उप-जोडणीच्या स्थानिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल आणि देशात पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी अधिक कालावधी उपलब्ध होईल, परिणामी उत्पादन परिसंस्थेचा विस्तार होऊन ती अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ही योजना अर्जदारांसाठी अधिक लवचिकता आणि पर्याय प्रदान करते, तसेच विकासाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना वाढती विक्री आणि गुंतवणुकीच्या सर्वोच्च पातळीशी जोडलेली आहे. त्याव्यतिरिक्त, आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना 2.0 अंतर्गत प्रोत्साहन देण्यात आलेले घटक म्हणून सेमीकंडक्टर डिझाइन, IC उत्पादन आणि पॅकेजिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे.  

  • आयटी हार्डवेअर साठी पीएलआय योजना 2.0, ₹ 17,000 अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूर.
  • या योजनेमुळे एकूण ₹ 3.35 लाख कोटी उत्पादनाची, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ₹ 2,430 कोटी अतिरिक्त गुंतवणुकीची आणि त्यामुळे 75,000 अतिरिक्त थेट रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे.
  • ही योजना लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (यूएसएफएफ) उपकरणांच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनाला चालना देईल, आणि 2025-26 पर्यंत सुमारे 300 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या (USD) इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या उलाढालीचे उद्दिष्ट गाठण्यामध्ये महत्वाचे योगदान देईल.  
  • पीएलआय साठी यापूर्वी मंजुरी मिळालेल्या अर्जदारांना पीएलआय 2.0 अंतर्गत अर्ज करण्याची परवानगी दिली जाईल.
  • योजने अंतर्गत, जागतिक कंपन्या, हायब्रीड (जागतिक/स्थानिक) कंपन्या आणि स्थानिक कंपन्या अशा तीन श्रेणी आहेत.   

आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजना 2.0 चे तपशील पुढील लिंक वर उपलब्ध आहेत:

https://www.meity.gov.in/content/production-linked-incentive-scheme-pli-20-it-hardware

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928390) Visitor Counter : 122