कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि वैयक्तिक व्यापक संपर्कामुळे गेल्या 9 वर्षात भारत हे जगातील आघाडीचे राष्ट्र बनले : केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
29 MAY 2023 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मे 2023
गेल्या 9 वर्षात भारत हे जगातील आघाडीचे राष्ट्र बनले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक व्यापक संपर्क आणि दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाले. जगातील सर्वात प्रभावशाली नेते ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचा मान उंचावला, असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज चेन्नई येथे केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चेन्नई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, विकासाचा संदेश, नवनवीन सुधारणा आणि अभूतपूर्व पायाभूत विकास या घटकांनीच भारताची विकसित राष्ट्रांच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सर्व सुधारणा आणि योजना अत्यंत संवेदनशीलतेने आणि त्यांचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन आखण्यात आल्या होत्या, असे ते म्हणाले.
गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका नव्या पुनरुत्थानाच्या युगात नेले आहे. समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी केंद्राने क्रांतिकारी पावले उचलली आहेत. ते म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक पटलावर नवीन उंची गाठत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे, हे ही मंत्री महोदयांनी अधोरेखित केले.
2024 पर्यंत ग्रामीण भारतातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवणे हा जल जीवन अभियानाचा उद्देश आहे.
पंतप्रधान मोदींनी येणार्या 25 वर्षात भारत 100 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारताला विकसित देश बनवण्याच्या त्यांच्या 'पंच प्राण' लक्ष्यांची रूपरेषा आखली आहे. या पंचप्राण लक्ष्यांच्या उद्देश्शाबाबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केली आहे.
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928123)
Visitor Counter : 160