विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
नेट-झिरो फ्युचर प्रुफ बिल्डिंग 2022-2023 साठीच्या सोलर डेकॅथलॉन इंडिया डिझाइन चॅलेंज स्पर्धेचे विजेते घोषित
स्पर्धेच्या तिसर्या पर्वात 12 संघांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले, ज्यामध्ये 1780 विद्यार्थी आणि 126 शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदवला
विद्यार्थ्यांच्या संघांनी सादरीकरणाच्या शेवटच्या दिवशी 36 रियल बिल्डिंग प्रकल्पांसाठी नेट-झिरो उपाय केले सादर
Posted On:
28 MAY 2023 3:04PM by PIB Mumbai
म्हैसूर येथील इन्फोसिस कॅम्पसमध्ये आयोजित चॅलेंजच्या (स्पर्धेच्या) तिसऱ्या पर्वात एकूण 12 संघांनी सोलर डेकॅथलॉन इंडिया (SDI) डिझाईन चॅलेंज फॉर नेट-झिरो फ्युचर प्रुफ बिल्डिंगचे पारितोषिक जिंकले. बांधकाम क्षेत्रातल्या आणि माध्यम क्षेत्रातल्या दिग्गजांचा समावेश असलेल्या ग्रँड ज्युरी समोर आपापल्या विभागातून प्रथम आलेल्या सहा संघांनी त्यांच्या उपायांचे सादरीकरण केले आणि नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या V⁰ या संघाने सर्वात आश्वासक आणि गुंतवणुकीसाठी योग्य डिझाईनसाठीचे प्रतिष्ठेचे पारितोषिक जिंकले.
अंतिम फेरीसाठी 650हून अधिक जणांमधून 36 अंतिम रिअल बिल्डिंग प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले. 28 मे रोजी, सोलर डेकॅथलॉन इंडियाने प्रशिक्षणार्थी मेळा आयोजित केला होता. या मेऴाव्यात हवामान बदल आणि नेट-झिरो फ्युचरप्रुफ बिल्डिंगवर काम करणार्या आघाडीच्या संस्थांना सर्वोत्कृष्ट आणि बुद्धिमान संकल्पनांचा शोध घेता येतो.
या पुरस्कारांची घोषणा करताना, सोलर डेकॅथलॉन इंडियाचे संचालक प्रसाद वैद्य म्हणाले, “यापैकी काही विद्यार्थी संघांनी ज्या नेट-झिरो फ्युचर प्रुफ बिल्डिंगच्या डिझाईन विकसित केल्या आहेत, त्या भारतातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक डिझाइन संघांच्या कामाच्या तोडीच्या आहेत. अंतिम फेरीमध्ये जागतिक हवामान बदलाच्या आव्हानांसाठी शोधक आणि कल्पक उपाय कसे सादर केले गेले हे पाहणे उत्साहवर्धक होते.”
तीन दिवसांची अंतिम फेरी कार्बन न्यूट्रल इव्हेंट म्हणून आयोजित करण्यात आली होती. विजेत्यांना देण्यात आलेले सोलर डेकॅथलॉन इंडिया(SDI) करंडक हे सुद्धा कार्बन निगेटिव्ह (कार्बन रहित) होत्या, ज्या माध्यमातून सर्जनशीलता आणि चिकाटीने हवामान बदल कमी करणे कसे हाताळले जाऊ शकते हे दाखवून देता आले.
वर्ष 2023-24 च्या चॅलेंजमध्ये (स्पर्धेमध्ये) 30 हून अधिक संस्थांनी आव्हान स्वीकारणाऱ्या स्पर्धकांना संधी दिली.
अधिक माहितीसाठी;
संपर्क: पूजा सुरेश होल्लान्नवर, IIHS(आयआयएचएस)
ईमेल: phollannavar@iihs.ac.in
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927929)
Visitor Counter : 175