ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक सहभागाला चालना देण्याचा आयएसओ सदस्य देशांचा निर्धार, प्रमाणीकरणातील शाश्वततेवर नव्याने लक्ष केंद्रित करणार
44 व्या आयएसओ सीओपीओएलसीओ समारोप सत्रात सहभागींचे सखोल स्वारस्य आणि यशस्वी बहुपक्षीय सहभाग दिसून आला
Posted On:
28 MAY 2023 10:44AM by PIB Mumbai
नवी दिल्ली येथे दिनांक 23 ते 26 मे 2023 या कालावधीत आयोजित 44 व्या आयएसओ सीओपीओएलसीओचे समारोप सत्र 26 मे 2023 रोजी पार पडले. बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांचे बीजभाषण झाले. बीआयएसच्या अतिरिक्त महासंचालक ममता उपाध्याय लाल, नागपूरच्या आयआयएम संस्थेचे संचालक आणि बीआयएसच्या व्यवस्थापन तसेच प्रणाली विभाग मंडळाचे अध्यक्ष प्रा.बी.मेत्री आणि सीओपीओएलसीओच्या अध्यक्ष सॅडी डेंटन यांच्यासह आयएसओ तसेच सदस्य राष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी या कार्य्रक्रमाला उपस्थित होते. बीआयएसचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच इतर कर्मचारी वर्गाने देखील या कार्यक्रमात भाग घेतला.
बीजभाषणात निधी खरे म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत आपण ग्रह संरक्षणाच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. तसेच, ग्राहक संरक्षणाशी संबंधित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यात मदत व्हावी म्हणून सशक्त ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा देखील विकसित करण्यात आली आहे.” प्रमाणीकरणावरील प्रमुख विचार म्हणून शाश्वतता राखण्याच्या गरजेवर भर देत त्या म्हणाल्या, “उत्पादकांनी त्यांची उत्पादने शाश्वततेच्या निर्देशांकांना अनुसरून निर्माण केली जात आहेत याची सुनिश्चिती केली पाहिजे. तसेच त्यांन ई-कचरा कमी करण्याच्या प्रक्रियेत देखील सहभागी होता येईल.”
ममता उपाध्याय लाल यांनी यावेळी उपस्थितांना बीआयएसची कार्ये आणि उपक्रम यांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “बीआयएसने, प्रमाणीकरणात ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी मानक मंथन,क्वालीटी कनेक्ट इत्यादींसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.”
सॅडी डेंटन यांनी या कार्यक्रमात बोलताना ग्राहक संरक्षणासाठी मानकांच्या मूल्यांची जाणीव ग्राहक भागधारकांना करून देण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्य देशांनी दिलेल्या सहभागाबद्दल तसेच त्यांच्या कटिबद्धते बाबत कौतुक व्यक्त केले. ग्राहकांचे नुकसान कमी होण्याच्या दृष्टीने उत्तम पद्धती सुरूर करुन, खऱ्या जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या विश्वासार्ह आणि सशक्त मानकांचे विकसन करण्यात ग्राहकांना आकर्षित करून सहभागी करून घेतल्याबद्दल देखील त्यांनी सर्व सदस्य देशांची प्रशंसा केली.
सीओपीओएलसीओ या ग्राहक धोरणासाठीची आयएसओ समितीची ही परिषद म्हणजे ग्राहक सहभाग क्षेत्रातील बहुपक्षीय संघटनांचा महत्त्वाचा सरकारी कार्यक्रम आहे. आयएसओ या संघटनेत सदस्य म्हणून 168 देशांचा सहभाग असून, प्रमाणीकरण प्रक्रिया बळकट करणे तसेच त्यात जागतिक पातळीवर ग्राहकांचा सहभाग वाढविणे या उद्देशाने ही संस्था भागधारक गट, समित्या आणि समुदायांच्या संवेदनशील बैठकांची साखळी आयोजित करत असते.
“ग्राहक सहभागासाठीची आव्हाने आणि उत्तम पद्धती’, शाश्वत भविष्यासाठी ग्राहकांचे सक्षमीकरण, ग्राहक संरक्षण आणि कायदेशीर चौकटी यांसारख्या लोककेंद्री दृष्टीकोन आणि संकल्पनांमुळे यावर्षीची बैठक आंतरराष्ट्रीय सानुदायासाठी विशेष महत्त्वाची ठरली असे ,मत या बैठकीतील सहभागी तसेच प्रतिनिधींनी व्यक्त केले. या वेळी जगभरातील मंत्री आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींसह, प्रख्यात वक्त्यांची भाषणे तसेच कार्यशाळा यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्राहक सहभाग या विषयावर आधारित गटचर्चांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहक कल्याण संघटना यांचे प्रतिनिधी यांच्या सभेला संबोधित केले.
***
S.Pophale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927849)
Visitor Counter : 180