संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 28-30 मे 2023 दरम्यान नायजेरियाला भेट देणार- अध्यक्षपदी निवड झालेले बोला अहमद तिनुबू यांच्या शपथविधी समारंभाला राहणार उपस्थित


पश्चिम आफ्रिकी देशाला कोणत्याही भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेली ही पहिली भेट असेल

Posted On: 27 MAY 2023 10:04AM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 28-30 मे 2023 दरम्यान पश्चिम आफ्रिकन राष्ट्राचे निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नायजेरियाला भेट देतील. राजनाथ सिंह 29 मे रोजी अबुजा येथील ईगल स्क्वेअर येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. 28 मे रोजी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते नायजेरियाचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुहम्मद बुहारी यांचीही भेट घेतील.

पश्चिम आफ्रिकी देशाला कोणत्याही भारतीय संरक्षणमंत्र्यांनी दिलेली ही पहिली भेट असेल.

दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे अतिशय मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांची ही भेट  अतिशय महत्त्वाची ठरेल. भारत आणि नायजेरिया यांच्यातील वाढते संरक्षण सहकार्य विचारात घेऊन संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाच्या संरक्षणविषयक सार्वजनिक उपक्रमातील वरिष्ठ यावेळी राजनाथ सिंह यांच्यासोबत असतील. नायजेरियन उद्योग आणि संरक्षण दलांचे प्रतिनिधी यांच्यासोबत ते भारतीय संरक्षण उद्योगाकडून नायजेरियाच्या संरक्षणविषयक गरजांना जी उपकरणे आणि मंच यांच्या माध्यमातून पाठबळ मिळेल त्याबाबत चर्चा करेल. नायजेरियामध्ये भारतीय समुदायाचे अंदाजे 50,000 सदस्य आहेत. या भेटीदरम्यान संरक्षणमंत्री अबुजा येथे भारतीय समुदायासमोर आपले विचार व्यक्त करतील.

***

N.Joshi/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927666) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu