महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि मुलांच्या  तस्करीला  प्रतिबंध’ तसेच, “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ विरोधी कायदा, 2013’ अंतर्गत, मोहालीच्या एनआयपीसीसीडीच्या प्रादेशिक केंद्रात ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

Posted On: 26 MAY 2023 4:50PM by PIB Mumbai

 

महिला आणि मुलांच्या तस्करीला  प्रतिबंधया विषयावर, 23 आणि 24 मे 2023 रोजी, मोहालीचे एनआयपीसीसीडी प्रादेशिक केंद्रात, अंगणवाडी सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच, कामाच्या ठिकाणी महिलांची होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध  कायदा, 2013’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणखी एक ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एनआयपीसीसीडी प्रादेशिक केंद्रातच, शाळेचे मुख्याध्यापक आणि अंतर्गत समितीचे सदस्य यांच्यासाठी 25 मे 2023 रोजी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकूण 62 लोकांनी यात सहभाग घेतला.

सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्याच्या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकत, DIET येथील SCERT च्या शिक्षकांसाठी 'ऑनलाइन लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण' या विषयावर 22-24 मे, 2023 दरम्यान एनआयपीसीसीडी, नवी दिल्ली येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 61 शिक्षकांनी सहभाग घेतला.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927629) Visitor Counter : 116


Read this release in: Urdu , English , Hindi , Manipuri