युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या प्रयत्नांची केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
26 MAY 2023 6:06PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी उत्तरप्रदेश सरकारने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. बी. बी. डी. विद्यापीठ मैदानावर आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांनी लखनौ येथे स्पर्धेच्या विविध आयोजन स्थळांना भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
बीबीडी बॅडमिंटन अकादमी येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना प्रामाणिक म्हणाले, “खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच 200 पेक्षा जास्त, खरेतर 206 विद्यापीठांमधील सुमारे 4700 क्रीडापटू 21 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. जो आतापर्यंतचा सर्वोच्च सहभाग आहे. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथमच वॉटर स्पोर्ट्सचा समावेश करण्यात आला असून, या स्पर्धा गोरखपूर येथे होतील. तसेच, प्रथमच या स्पर्धा राज्याच्या अनेक शहरांमध्ये आयोजित केल्या जात आहेत.



खेलो इंडिया स्पर्धांच्या व्यापक कार्यक्रमाबद्दल बोलताना ते म्हणाले, “खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या क्रीडापटूंना जे व्यासपीठ मिळत आहे, ते भारताला एक क्रीडा राष्ट्र, क्रीडा केंद्र म्हणून विकसित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आणि दृष्टीकोन साकारण्याच्या दिशेने आपल्याला पुढे घेऊन जाईल असा मला विश्वास आहे.”
मंत्रालयाने हाती घेतलेल्या अनेक नवीन उपक्रमांचा तपशीलही केंद्रीय मंत्र्यांनी सादर केला, जे यापूर्वीच्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नव्हते. “या स्पर्धांमध्ये अनेक नवीन गोष्टी पहिल्यांदाच अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. एका समर्पित संकेतस्थळासह, एक समर्पित अॅपही सुरू करण्यात आले आहे. यामुळे खेळाडूंना कागदपत्रांच्या प्रक्रियेमधून सुटका मिळेल, आणि चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते निवास, प्रवेश इत्यादी गोष्टींची हाताळणी करू शकतील. तसेच, डिजी-लॉकरच्या मदतीने, क्रीडापटू स्पर्धा संपल्यावर लगेच त्यांचे प्रमाणपत्र मिळवू शकतील.”
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1927628)
आगंतुक पटल : 203