उपराष्ट्रपती कार्यालय
राज्य सरकारांनी सीमा सुरक्षा दलाप्रती सहानुभूती आणि संवेदनशीलता बाळगावी असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे आवाहन
बीएसएफचे जवान धैर्य, शौर्य आणि समर्पणाचे उदाहरण आहेत असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे गौरवोद्गार
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2023
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सर्व राज्य सरकारांना, विशेषतः सीमावर्ती भागातील राज्य सरकारांना आवाहन केले आहे की त्यांनी सीमा सुरक्षा दला बद्दल सहानुभूती आणि संवेदनशीलता बाळगावी. भारताच्या लांब, गुंतागुंतीच्या सीमांचे रक्षण करताना बीएसएफ च्या जवानांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन, संबंधित राज्यांनी सकारात्मक पावले उचलावीत आणि आपल्या यंत्रणेला संवेदनशील बनवावे, जेणे करून बीएसएफ जवानांचे मनोबल कायम उंचावलेले राहील, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात, सीमा सुरक्षा दलाच्या विसाव्या अलंकरण समारंभात आयोजित रुस्तमजी स्मृती व्याख्यान 2023 मध्ये ते आज बोलत होते. सीमावर्ती भागातील नागरिकांनीही बीएसएफ चा विस्तार आणि त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या समारंभात बीएसएफ च्या 35 जवानांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये शौर्यसाठी 2 पोलीस पदके आणि असाधारण सेवेसाठीच्या 33 पोलीस पदकांचा समावेश होता.
बीएसएफ जवानांच्या आपल्या कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची प्रशंसा करून ते म्हणाले की त्यांच्यापैकी प्रत्येकाने पराकोटीची वचनबद्धता आणि राष्ट्रप्रेम प्रदर्शित केले असून, आपल्यापैकी प्रत्येकाने त्याचे अनुकरण करायला हवे. "बीएसएफचे शूर पुरुष आणि महिला सर्वांसमोर देश सेवे प्रति धैर्य, शौर्य आणि समर्पणाचे उदाहरण ठेवत आहेत," ते पुढे म्हणाले.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1926986)
आगंतुक पटल : 134