राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू 24 ते 26 मे दरम्यान झारखंडच्‍या दौ-यावर

प्रविष्टि तिथि: 23 MAY 2023 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मे 2023

 

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू 24 ते 26 मे, 2023 या काळात झारखंडच्‍या दौ-यावर जाणार आहेत.

या झारखंड भेटीमध्‍ये 24 मे रोजी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्‍या हस्‍ते झारखंड उच्च न्यायालयाच्या नवनिर्मित भवनाचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे.

25 मे 2023 रोजी, राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू खुंटी येथे केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या महिला संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच रांची येथील नामकुम मधील  भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहतील. त्याच दिवशी संध्याकाळी रांची येथील राजभवनात झारखंड सरकारने राष्ट्रपती  मुर्मू यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभाला त्या  उपस्थित राहतील.

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1926776) आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi